मायणी-दहिवडी मार्गाला अखेर मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:39+5:302021-06-24T04:26:39+5:30

मायणी : मिरज-भिगवण राज्यमार्गावरील मायणी-दहिवडी मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून, खटाव तालुक्याच्या हद्दीपासून (तडवळे) या मार्गाच्या दुरुस्तीचे काम ...

The Mayani-Dahivadi route finally found its moment | मायणी-दहिवडी मार्गाला अखेर मुहूर्त सापडला

मायणी-दहिवडी मार्गाला अखेर मुहूर्त सापडला

googlenewsNext

मायणी : मिरज-भिगवण राज्यमार्गावरील मायणी-दहिवडी मार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून, खटाव तालुक्याच्या हद्दीपासून (तडवळे) या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा-सांगली-पुणे-अहमदनगर जिल्ह्याला जोडणाऱ्या व नुकताच केंद्राकडे वर्ग करण्यात आलेल्या मिरज-भिगवण राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या मार्गावरील फक्त खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मधून ‘अधिकारी, लोकप्रतिनिधींना दिसेनात खड्डे’ या मथळ्याखाली शनिवार, दि. १९ रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तानंतर संबंधित विभागाने तातडीच्या हालचाली करून या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

मंगळवारी या मार्गावरील खटाव तालुक्‍याच्या हद्दीपासून श्री पिंगळजाई देवी मंदिर बोंबाळे गावापर्यंतचे सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील खड्डे भरून बुधवारी यावर (बीबीएम) खडी मिश्रित डांबराचा थर देण्याचे काम सुरू झाले आहे. या मार्गाचे काम सुरू झाल्याने या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व या मार्गावरून नित्यनियमाने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच या मार्गाचे काम तडवळेपासून बोंबाळे, कातरखटाव, सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी ते जिल्हा हद्दीपर्यंत होणे गरजेचे आहे. या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण मार्ग खड्डेमुक्त व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.

(चौकट)

संबंधित राज्यमार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे? त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण कधी होणार? सध्या सुरू असलेले काम किती किलोमीटर आहे? मार्ग नक्की कोणत्या पद्धतीचा होणार? आहे? की फक्त मार्गावरील खड्डे भरून यावर खडीमिश्रित डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपात निधी खर्च करणे, अशा भूमिकेतून होत आहे? का, असे अनेक प्रश्‍न सध्या सर्वसामान्य ग्रामस्थ व वाहनचालकांना पडत आहेत.

चौकट -

खटाव तालुक्यातील या सुमारे तीस किलोमीटर राज्य मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठा निधी न पडल्याने तसेच मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे चुकवताना वाहनचालक रस्ता सोडून साईटपट्ट्यांचा वापर करत आहे. त्यामुळे या मार्गावरील साईडपट्ट्या खचल्या आहेत. पट्ट्यांवर ही मोठ-मोठे खड्डे भरले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये मार्गाच्या कडेच्या साईटपट्ट्या ही व्यवस्थित करणे गरजेचे आहे.

(बातमीचा फोटो वापरणे )

फोटो आहे..

शनिवार दि. १९ जून रोजी ‘लोकमत’न प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर मायणी दहिवडी मार्गाला अखेर मुहूर्त सापडला.

Web Title: The Mayani-Dahivadi route finally found its moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.