मायणीत बारावी परीक्षेला प्रारंभ, केंद्रामध्ये सहाशे विद्यार्थ्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:59 PM2019-02-21T12:59:23+5:302019-02-21T13:01:17+5:30
मायणी येथील भारतमाता ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षा केंद्र्रामध्ये गुरुवारपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. या केंद्र्रामध्ये सहाशे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक एस. आर. काळे यांनी दिली.
मायणी : येथील भारतमाता ज्युनिअर कॉलेजमधील बारावी परीक्षा केंद्र्रामध्ये गुरुवारपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. या केंद्र्रामध्ये सहाशे विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती केंद्र संचालक एस. आर. काळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेसाठी मायणी (ता. खटाव) येथील भारत माता ज्युनिअर कॉलेजच्या या केंद्र्रावर मायणीसह कुकुडवाड (ता. माण) व माहुली (ता. खानापूर जि. सांगली) या तिन्ही ठिकाणांमधील आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचे एकूण सहाशे विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.
परीक्षा यशस्वीसाठी प्राचार्य एस. डी. खैरमोडे, केंद्र सहायक एस. ए. पवार, सी. एस. सजगणे यांच्यासह सर्व विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, सेवकवर्ग काम पाहत आहेत.