नगराध्यक्षांचा पतीसह ‘बंटी-बबली’सारखा कारभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:09+5:302021-07-02T04:27:09+5:30

दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना फेरअर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ...

Mayor's dealings with her husband like 'Bunty-Babli'! | नगराध्यक्षांचा पतीसह ‘बंटी-बबली’सारखा कारभार!

नगराध्यक्षांचा पतीसह ‘बंटी-बबली’सारखा कारभार!

googlenewsNext

दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना फेरअर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ९ जुलैपर्यंत अर्थसंकल्पास मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर राजेंद्र यादव व नगरसेवकांनी उपोषण स्थगित केले.

महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नगरसेवक किरण पाटील, गजेंद्र कांबळे, अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, प्रियांका यादव, सुप्रिया खराडे, बापू देसाई, ओंकार मुळे यांची उपस्थिती होती. या उपोषणास पालिकेचे सर्व ठेकेदार, कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला.

यावेळी गटनेते यादव यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, एका हॉस्पिटलमधून दर महिन्याला ४० हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या नगराध्यक्षा आहेत. पैसे कमावणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. ठेकेदारांची त्यांनी पिळवणूक केली आहे. ‘बंटी और बबली’सारखा त्यांचा व त्यांच्या पतीचा कारभार सुरू आहे. नगराध्यक्षांनी सादर केलेल्या अहवालात बजेट बहुमताने मंजूर झाल्याचे म्हटले आहे. मात्र, नंतर अहवालातील उल्लेख नजरचुकीने झाला असल्याचा त्या सांगतात. त्यानंतर दिलेल्या अहवालात त्यांनी अर्थसंकल्प एकमताने मंजूर झाल्याचे म्हटले आहे. हा बुद्धिभेदाचा, फसवणुकीचा खेळ पालिकेत सुरू आहे. यामध्ये संपूर्ण शहर भरडले जात आहे.

फोटो : ०१केआरडी०४

कॅप्शन : कऱ्हाड पालिकेत गुरुवारी जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांच्यासह नगरसेवकांनी उपोषण केले.

Web Title: Mayor's dealings with her husband like 'Bunty-Babli'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.