घरासमोरच जेवण, पाण्याची केली सोय : कोरोनातही पक्षीजीवांची काळजी ! क-हाडात पक्षीप्रेमींचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:29 AM2020-04-30T11:29:17+5:302020-04-30T11:29:59+5:30
क-हाड येथील उद्यानात अनेक प्रकारची वृक्षे फुलली आहेत. तसेच शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या छत्रपती शिवाजी उद्यानात परिसरात राहणाऱ्या लोकांनी माणुसकीतून पक्ष्यांसाठी अन्न तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात त्यांना गारवा मिळत आहे. तर बुधवार पेठ येथील संतोष आंबवडे यांच्याकडून देखील
संतोष गुरव ।
क-हाड : उन्हाळा सुरू झाला की पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. मात्र, वाहतुकीच्या रहदारीमुळे त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. सध्या कोरोना व लॉकडाऊनमुळे संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे लोक आपल्या घरामध्ये बंदिस्त आहेत. तर पक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत आहेत. मात्र, वाढत्या उष्माघातामुळे त्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. अशा पक्षीजीवांना सिमेंटच्या जंगलात मात्र, माणुसकीचा आधार मिळू लागलाय. तो म्हणजे कºहाड शहरात शंभरहून अधिक कुटुंबांनी पक्ष्यांसाठी घर, अंगण तसेच गच्चीवर पिण्याच्या पाण्याची व खाण्याची सोय केलेली आहे.
क-हाड येथील उद्यानात अनेक प्रकारची वृक्षे फुलली आहेत. तसेच शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या छत्रपती शिवाजी उद्यानात परिसरात राहणाऱ्या लोकांनी माणुसकीतून पक्ष्यांसाठी अन्न तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात त्यांना गारवा मिळत आहे. तर बुधवार पेठ येथील संतोष आंबवडे यांच्याकडून देखील आपल्या घरासमोरच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे मडके तसेच खाण्यासाठी ज्वारी ठेवली जात आहे.
क-हाड शहरात एकूण चार उद्याने आहेत. प्रीतिसंगमावरील स्वामीबाग, टाऊनहॉल येथील बाग, सुपरमार्केट येथील आदरणीय पी. डी. पाटील उद्यान आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी उद्यान होय. त्यामध्ये सध्या पक्षी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे. मात्र, या व्यतिरिक्त त्यांची कºहाड शहरातील काही कुटुंबांकडूनही खाण्यापिण्याची सोय केली जात आहे