हॉटेलमध्ये वास्तव्याला असणाऱ्यांना संचारबंदीतही जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:01+5:302021-06-26T04:27:01+5:30

सातारा : कोविडबाधित रुग्णांच्या कोरोना रुग्णवाढीचा दर या निकषानुसार सातारा जिल्हा अद्यापही तिसऱ्या स्तरामध्ये आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी ...

Meals are also available for those staying in hotels | हॉटेलमध्ये वास्तव्याला असणाऱ्यांना संचारबंदीतही जेवण

हॉटेलमध्ये वास्तव्याला असणाऱ्यांना संचारबंदीतही जेवण

googlenewsNext

सातारा : कोविडबाधित रुग्णांच्या कोरोना रुग्णवाढीचा दर या निकषानुसार सातारा जिल्हा अद्यापही तिसऱ्या स्तरामध्ये आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी १८ जून अन्वये लागू असलेले निर्बंध आदेशामध्ये सुधारणा केल्या असून, आता हॉटेल व रेस्टारंट सोमवार ते शुक्रवारपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. शनिवार, रविवारी संचारबंदी असली तरी हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्राहकांना या दिवशीही जेवण देता येणार आहे.

ज्या हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे. अशा हॉटेल रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ या कालावधीमध्ये आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल व रेस्टॉरंट चालू ठेवण्यास परवानगी असेल. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजल्यानंतर व शनिवार व रविवार या दिवशी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींनाच आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सेवा पुरविणेस परवानगी असेल; परंतु हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये जेवण, नाष्टा घेणाऱ्या व्यक्तींनी लॉजिंगसाठी अगोदर बुकिंग करणे बंधनकारक आहे. याबाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहकांनी कोरोनाच्या उपाययोजनांच्या नियमाचे पालन न केल्यास त्यांच्यावर ५०० रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. जर एखाद्या ग्राहकाकडून कोविड-१९ विषयक नियमांचे पालन होत नसेल आणि अशा दुकानातून जर या ग्राहकास सेवा दिली जात असेल तर संबंधित दुकानाला १ हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. कारवाईनंतरही दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड -१९ साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी संबंधित आस्थापना अथवा दुकान बंद केले जाईल.

या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभागप्रमुख यांनी करावी.

आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली व भारतीय दंड संहितानुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

...तर आस्थापना बंद

कुठल्याही आस्थापनेने नियमांचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये इतका दंड आकाराला जाणार आहे. या कारवाईनंतरही दुसऱ्यांदाही नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील एक महिन्यापर्यंत आस्थापना बंद केली जाईल. त्यानंतर ही वांरवार नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड-१९ साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी संबंधित आस्थापना-दुकान बंद केले जाईल.

Web Title: Meals are also available for those staying in hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.