कोरोना रोखण्यासाठी पालमध्ये उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:24 AM2021-06-30T04:24:50+5:302021-06-30T04:24:50+5:30
पाल ग्रामपंचायतीमार्फत कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छ व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे, यासाठी वॉटर प्युुरिफायर ...
पाल ग्रामपंचायतीमार्फत कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छ व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे, यासाठी वॉटर प्युुरिफायर प्राथमिक उपकेंद्र तसेच ग्रामपंचायतीत बसविण्यात आले आहे. गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जयवंत शुगर कारखान्याच्या सहकार्याने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा विचार करता, अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक सोमवारी ग्रामपंचायतीत कोरोना आढावा बैठक घेण्यात येते. यावेळी गावातील आशा सेविका, अंगणवाडी शिक्षिकांचा सन्मान करण्यात येतो.
पाल ग्रामपंचायतीत इन्व्हर्टर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून यावेळी सुरेश पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, ग्रामविस्तार अधिकारी सुरेश लादे, तलाठी अमोल कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो : २९केआरडी०३
कॅप्शन :
पाल, ता. कऱ्हाड येथील विलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा सत्कार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच जयश्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.