सातारच्या मेडिकल कॉलेजला मिळाले मूर्त स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:39+5:302021-01-16T04:43:39+5:30

सातारा : सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या ...

The Medical College of Satara got a tangible form | सातारच्या मेडिकल कॉलेजला मिळाले मूर्त स्वरूप

सातारच्या मेडिकल कॉलेजला मिळाले मूर्त स्वरूप

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून कॉलेजच्या जागा हस्तांतरणानंतर आता १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हावासीयांच्यावतीने आभार मानले आहेत.

गेले अनेक दिवसांपासून सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न गाजत होता. मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई येथे दोनदिवसीय अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्याचा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीवरून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाढीव ६० एकर जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ६१ कोटी रुपये निधीची तरतूदही करण्यात आली होती. दरम्यान, जागेसह संपूर्ण मेडिकल कॉलेज उभारणीसाठी निधीची तरतूद व्हावी आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीला पवार यांनी प्राधान्य देत सातारच्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न निकाली काढला. ना. अजित पवार आणि अमित देशमुख यांच्या सूचनेवरून सातारा येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय उभारणी केली जाणार आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज उभारणीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करून सातारा जिल्हावासीयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पवार आणि देशमुख यांचे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

चाैकट

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागाची मंजुरी

अनुषांगिक बांधकामाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. त्यासाठी एकूण ४९५ कोटी ४६ लाख एवढ्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या मेडिकल कॉलेजचे स्वप्न आता सत्यात उतारण्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

Web Title: The Medical College of Satara got a tangible form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.