मेडिकल विद्यार्थ्यांनो, बाँडसेवा करा किंवा १० लाख भरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:33+5:302021-04-28T04:42:33+5:30

सातारा : वैद्यकीय शिक्षणात पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाँडसेवा (बंधनपत्रित सेवा) सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा ...

Medical students, do bond service or pay Rs 10 lakh! | मेडिकल विद्यार्थ्यांनो, बाँडसेवा करा किंवा १० लाख भरा !

मेडिकल विद्यार्थ्यांनो, बाँडसेवा करा किंवा १० लाख भरा !

Next

सातारा : वैद्यकीय शिक्षणात पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाँडसेवा (बंधनपत्रित सेवा) सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा करायची नसल्यास १० लाख रुपये भरून त्यातून सवलत घेता येणार आहे. कोरोनाची स्थिती पाहता आम्ही सेवा करणार आहोत. मात्र, त्यासाठी शासनाने आम्हाला थोडा वेळ द्यायला हवा होता. सक्ती केल्याने आमच्यावर दडपण आले असल्याची प्रतिक्रिया पदवीधर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

राज्यात वैद्यकीय शिक्षणामध्ये पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा करणे बंधनकारक आहे. त्याबाबतचा बॉंड या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाला प्रवेशित होताना लिहून घेतला जातो. ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशित होईपर्यंत सेवा देणे बंधनकारक आहे. ज्यांना ही सेवा करायची नाही. त्यांना १० लाख रुपये भरून या सेवेबाबतच्या बाँडमधून मुक्त होता येते. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने बॉंडसेवा बंधनकारक केली आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

अंतिम वर्षातील विद्यार्थी काय म्हणतात?

बाँडसेवा करण्यास आमची हरकत नाही. मात्र, सध्या काही विद्यार्थ्यांची इंटर्नशीप पूर्ण झाली, तर काही जणांची अद्याप बाकी आहे. त्यांना सेवेबाबत एकच नियम राहणार का? विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सर्कलमधील त्यांना सेवेसाठी हवा असणारा जिल्हा मिळणार का? हे शासनाने स्पष्ट करावे.

-डॉ. सौरभ शिंदे, सातारा

पाच वर्षांमध्ये कधीही आम्हाला बाँडसेवा करण्याची सवलत होती. मात्र, यावर्षी सक्तीमुळे दडपण आले आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता बाँडसेवा करण्यास आमचा नकार नाही. पण, अनेक विद्यार्थी पी. जी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तयारी करत आहेत. त्यातच बॉंडसेवेबाबतची प्रक्रिया खूप जलदगतीने राबविण्यात आली. आम्हाला मानसिक तयारीसाठी थोडा वेळ द्यायला हवा होता.

- डॉ. शांती मुनोत, सातारा

कोरोनामध्ये सेवा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, पी. जी. अभ्यासक्रम प्रवेशाची तयारी लक्षात घेता शासनाने स्व:इच्छेने बाँडसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी प्राधान्य द्यायला हवे होते. नियोजन करून प्रक्रिया राबवायला हवी होती.

- डॉ. संयुक्ता पारेख, सातारा

चौकट

गावात सेवा नको रे बाबा

बहुतांश विद्यार्थ्यांना पदव्युतर अभ्यासक्रमांची तयारी करायची असते. त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागामध्ये सेवा करण्याऐवजी पदव्युतर अभ्यासक्रमास प्रवेश कसा मिळेल, हेच लक्ष्य असते. त्यामुळे त्यांना सेवा नको वाटते.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

बाँडसेवा करावी लागणारे राज्यातील विद्यार्थी : २,४७९

Web Title: Medical students, do bond service or pay Rs 10 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.