बैठकीच्या बचत भवनात गठ्ठ्यांची सभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 05:20 PM2017-08-02T17:20:22+5:302017-08-02T17:20:22+5:30

कºहाड : कºहाड पंचायत समितीत वर्षानूवर्षे धूळखात पडून असलेले गठ्ठे हे सध्या समितीच्या बचत भवन येथील सभागृहात हलविलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी कर्मचाºयांकडून आपापल्या विभागातील गठ्ठ्यांचे सर्र्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी अधिकाºयांच्या बैठका होतात त्या ठिकाणी फायलींचे गठ्ठे आहेत. त्यामुळे एखादी बैठक किंवा सभा घ्यायची झाल्यास घेणार कोठे असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Meeting of meetings in the Savings Bhawan! | बैठकीच्या बचत भवनात गठ्ठ्यांची सभा !

बैठकीच्या बचत भवनात गठ्ठ्यांची सभा !

Next
ठळक मुद्देकºहाड पंचायत समितीत गठ्ठे वर्षानूवर्षे धूळखात पडून

कºहाड : कºहाड पंचायत समितीत वर्षानूवर्षे धूळखात पडून असलेले गठ्ठे हे सध्या समितीच्या बचत भवन येथील सभागृहात हलविलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी कर्मचाºयांकडून आपापल्या विभागातील गठ्ठ्यांचे सर्र्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी अधिकाºयांच्या बैठका होतात त्या ठिकाणी फायलींचे गठ्ठे आहेत. त्यामुळे एखादी बैठक किंवा सभा घ्यायची झाल्यास घेणार कोठे असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

पुणे येथील आयुक्त तपासणी झाल्यानंतर येथील प्रशासन विभागातील अधिकाºयांनी ३१ जुलैपूर्वी सर्व झिरो पेंडन्सीची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कºहाड पंचायत समितीच्या सर्वच विभागातील अधिकारी झाडून कामाला लागले आहेत. आता ३१ जुलै संपून गेलातरी अद्यापही गठ्ठ्यांचे सर्वेक्षण करण्यामध्ये अधिकारी व कर्मचाºयांना अडचणी निर्माण होत असल्याने सहनही होईना आणि सांगताही येईना अशी अवस्था त्यांची झाली आहे.

वरिष्ठांनी दिलेला आदेश कोणत्याही परिस्थिती पूर्ण करायचा ऐवढेच त्यांच्यापुढे सध्या उद्दिष्ट असून त्यासाठी त्यांना सुट्टी दिवशीही या ठिकाणी हजेरी लाऊन काम करावे लागत आहे.

Web Title: Meeting of meetings in the Savings Bhawan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.