‘कृष्णा’चा सभासद विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:38+5:302021-06-26T04:26:38+5:30

वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष ...

A member of 'Krishna' will not fall prey to the delusions of the opposition | ‘कृष्णा’चा सभासद विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही

‘कृष्णा’चा सभासद विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही

googlenewsNext

वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, बबनराव शिंदे, सयाजी यादव, जयवंत जगताप, पांडुरंग होनमाने, जगन्नाथ जगताप, माणिकराव जाधव, जयवंत साळुंखे, पैलवान आनंदराव मोहिते, संभाजी निकम, पांडुरंग जगताप, वसंत जगताप, विक्रम मोहिते, राजेंद्र थोरात, सत्यवान जगताप, दिलीप चव्हाण, धनाजी जगताप, भानुदास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, ‘निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे विरोधक काहीही प्रचार करत आहेत. भूलथापा देत आहेत. क्रियाशील - अक्रियाशील सभासद यांच्याबद्दल आरोप विरोधक करतात. मात्र ९७ वी घटना दुरुस्ती ही अविनाश मोहितेंनी सत्तेवर असताना स्वीकारली. त्यांच्या काळात यासाठी सभाही झाली. आता तेच टीका करत आहेत. कृष्णा कारखान्याची सत्ता ही सभासदांच्या हितासाठी असते. त्या ठिकाणी असलेल्या पदाचे पावित्र्य आहे. यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांनी शेतकरी कल्याणासाठी काम केले. कृष्णा कारखान्यावर लाखो लोकांचे कुटुंब अवलंबून आहे. आम्ही गेल्या ६ वर्षांत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. कृष्णा कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.’

जगदीश जगताप म्हणाले, ‘आमच्या संचालक मंडळासोबत कारखान्यात असणाऱ्या विरोधी संचालकांनी पाच वर्षांत एकदाही कारभाराबाबत शब्द काढला नाही. कारण आम्ही पारदर्शकपणे कारभार केला. विरोधक घातक प्रचार करत आहेत. पण त्यांच्या अशा प्रचाराला कोणी भुलणार नाही. सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काही बाहेरचे लोक साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूक लढवणार असल्याचे म्हणत आहेत. पण कृष्णा हा एक परिवार आहे. तिथं घरातले लोक कारभारी कोण हे ठरविणार आहेत.’

जयवंत जगताप म्हणाले, ‘आम्ही सर्वजण विकासासोबत म्हणजेच डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत आहोत. कारखाना चांगला चालला आहे.’

यावेळी भूषण जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीरंग साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अशोक जगताप यांनी मानले.

फोटो ओळी :

वडगाव हवेली ता. कऱ्हाड येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार सभेत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी भाषण केले.

Web Title: A member of 'Krishna' will not fall prey to the delusions of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.