सहा गटात विखुरलेत ‘कृष्णा’चे सभासद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:20+5:302021-05-31T04:28:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. त्यासाठी २५ ...

Members of 'Krishna' scattered in six groups | सहा गटात विखुरलेत ‘कृष्णा’चे सभासद

सहा गटात विखुरलेत ‘कृष्णा’चे सभासद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. त्यासाठी २५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. १ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर अर्ज माघारी घेणे, चिन्हांचे वाटप हे सोपस्कार पूर्ण होऊन २९ जूनला मतदान व १ जुलैला मतमोजणी होणार आहे. यासाठी सुमारे ४७ हजार मतदार प्रक्रियेत सहभागी होणार असून, ते सहा गटांमध्ये विखुरलेले आहेत.

सातारा व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे ‘कृष्णा’च्या निवडणुकीमध्ये दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांचा कस लागतो. कारखान्याच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे रणधुमाळी पाहायला मिळत नसली, तरी राजकीय जोडण्यांत नेते मग्न असून, सहा गटांमध्ये उमेदवार निश्चित करताना आपल्या समर्थकांना संधी कशी मिळेल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

निवडणुकीसाठी असणारे गट व समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे -

वडगाव दुशेरे गट : तारुख, कुसुर, कोळेवाडी, अंबवडे, कोळे, आणे, येणके, किरपे, पोतले, घारेवाडी, येरवळे, विंग, चचेगाव, वारुंजी, कराड, बनवडी, गोवारे, कोपर्डे हवेली, पार्ले, विरवडे, करवडी, सदाशिवगड, सयापूर, टेंभू, कोरेगाव, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, तडसर, अपशिंगे, खंबाळे, नेर्ली, कोतवडे (एकूण ३३ गावे)

कार्वे - काले गट : भुरभुसी, टाळगाव, येवती, येणपे, जिंती, घोगाव, येळगाव, उंडाळे, म्हासोली, सवादे, तुळसण, मनव, नांदगाव, ओंड, काले, धोंडेवाडी, नारायणवाडी, मुनावळे, आटके, नांदालापूर, जखिणवाडी, मलकापूर, कापिल, गोळेश्वर, कार्वे (एकूण गावे २५ )

नेर्ले - तांबवे गट : तांबवे, धोत्रेवाडी, पेठ, नेर्ले, केदारवाडी, काळामवाडी, कासेगाव, शेणे, वाटेगाव, कापूसखेड, कासारशिरंबे, साळशिरंबे, बेलवडे बुद्रुक, वाठार, कालवडे (एकूण गावे १५)

रेठरेहरणाक्ष बोरगाव गट : कामेरी, विठ्ठलवाडी, इस्लामपूर, साखराळे, बोरगाव, मसुचीवाडी, बनेवाडी, फारणेवाडी, गेंडवाडी, साटपेवाडी, ताकारी, दुधारी, बहे, खरातवाडी, हुबालवाडी, रेठरे धरण, नायकलवाडी, वाघवाडी, जांभुळवाडी, मरळनाथपूर, शिवपुरी, महादेवनगर, माणिकवाडी, रेठरे हरणाक्ष, बिचुद, शिरटे (एकूण गावे २६)

येडेमच्छिंद्र वांगी गट : येडेमच्छिंद्र, किल्ले मच्छिंद्र, नरसिंगपूर, कोळे, आसद, मोहिते वडगाव, हिंगणगाव खुर्द, पाडळी, चिंचणी, अंबक, शिरगाव, शेळकबाव, वांगी, भाळवणी, कमळापूर, रामापूर, बलवडी, कुंभारगाव, देवराष्ट्रे (एकूण गावे १९)

रेठरे बुद्रुक गट : मालखेड, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक, खुबी, गोंदी, शेणोली, शेरे, सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव (एकूण गावे १०)

चौकट

या प्रत्येक गटामध्ये साधारणत: साडेसात ते आठ हजार सभासद मतदार आहेत. हे गट एका तालुक्यातील गावांचे असे नाहीत तर कार्यक्षेत्रातील गावांचे मिळून पाडण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना कसरत करावी लागणार आहे.

चौकट

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राज्य मंत्रिमंडळातील तीन मंत्री आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच महत्त्व आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, अर्थमंत्री जयंत पाटील यांचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

Web Title: Members of 'Krishna' scattered in six groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.