पुरुषांत सातारा, महिलांत कोल्हापूर अजिंक्य

By admin | Published: November 29, 2015 11:18 PM2015-11-29T23:18:51+5:302015-11-30T01:18:45+5:30

खेळाडू खाकी : त्रेचाळीसाव्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप

Men's Satara, Women's Kolhapur Ajinkya | पुरुषांत सातारा, महिलांत कोल्हापूर अजिंक्य

पुरुषांत सातारा, महिलांत कोल्हापूर अजिंक्य

Next

सातारा : त्रेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये साताऱ्याच्या पुरुषांच्या संघाने तर महिलांमध्ये कोल्हापूरच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दरम्यान, पोलीस बँडच्या तालावर खेळाडूंचे संचलन, हवेत सोडलेले रंगबिरंगी फुगे आणि आकर्षक आतषबाजीने या स्पर्धांचा दिमाखदार समारोप येथील पोलीस कवायत मैदानावर रविवारी झाला.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्या हस्ते विजेत्या संघांना ढाल प्रदान करण्यात आली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, सांगलीचे अधीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीणचे प्रभारी अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, निवृत्त पोलीस आयुक्त डी. एन. जाधव, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक वीरेश प्रभू, यजमान साताऱ्याचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. पुरुषांचे क्रीडाप्रकार आणि विजेते संघ पुढीलप्रमाणे : पुरुष फुटबॉल विजेता कोल्हापूर, हॉकी कोल्हापूर, बास्केटबॉल सोलापूर आयुक्तालय, हँडबॉल सोलापूर आयुक्तालय, खो-खो सांगली, कबड्डी पुणे ग्रामीण, ज्युदो सातारा, कुस्ती सांगली, वेटलिफ्टिंग सातारा, बॉक्सिंग सातारा, जलतरण सातारा, अ‍ॅथलेटिक्स सांगली, क्रॉसकंट्री कोल्हापूर.महिलांचे क्रीडाप्रकार आणि विजेते संघ पुढीलप्रमाणे : व्हॉलिबॉल कोल्हापूर, बास्केटबॉल कोल्हापूर, कबड्डी सांगली, ज्युदो सातारा, कुस्ती सातारा, वेटलिफ्टिंग सातारा, बॉक्सिंग सातारा, क्रॉसकंट्री कोल्हापूर, अ‍ॅथलेटिक्स सांगली. बेस्ट अ‍ॅथलीट म्हणून कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटील व युवराज गुरबे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)


एसपींनी धरला ठेका
कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीम पथक तसेच पंकज डान्स अ‍ॅकॅडमीच्या मुलामुलींनी गणेश वंदना सादर केली. संचलन आणि बक्षिस वितरणानंतर शिंगतुताऱ्या आणि हलग्यांच्या तालावर विजेत्या संघातील खेळाडूंनी नृत्य केले. यावेळी आग्रहाखातर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही ठेका धरला.


पुढील स्पर्धा सोलापूरला

मावळत्या सूर्याच्या साक्षीने, बिगुलाच्या ध्वनिलहरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस क्रीडा स्पर्धांचा ध्वज उतरविण्यात आला. पुढील स्पर्धांचे यजमानपद सोलापूर ग्रामीणकडे असून त्या संघाकडे हा ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

Web Title: Men's Satara, Women's Kolhapur Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.