मानसिक आरोग्य जपणे आवश्यक : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:50+5:302021-03-05T04:38:50+5:30

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात महिला सबलीकरण व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी किशोरी मेळावा ...

Mental health needs to be taken care of: Chavan | मानसिक आरोग्य जपणे आवश्यक : चव्हाण

मानसिक आरोग्य जपणे आवश्यक : चव्हाण

Next

पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात महिला सबलीकरण व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी किशोरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या, तर अध्यक्षस्थानी सुषमा पाटील होत्या. डॉ. हेमलता काटे व डॉ. एस.डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सीमा चव्हाण म्हणाल्या, महिला व मुलींनी करिअर निवडताना त्याची योग्य माहिती घ्यावी. शारीरिकदृष्ट्या प्रत्येकीने खंबीर असायला हवे. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्याही आपण सक्षम असणे गरजेचे आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. त्यामुळे स्वत:ला कमकुवत न समजता आपण सबला आहोत, हे मनात बिंबवणे आवश्यक आहे.

रूपाली भिंगार्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

फोटो : ०४केआरडी०४

कॅप्शन : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात आयोजित किशोरी मेळाव्यात डॉ. सीमा जाधव यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Mental health needs to be taken care of: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.