उन्हाचा चटका; सातारा जिल्ह्यात पारा ३५ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 02:19 PM2022-02-25T14:19:58+5:302022-02-25T14:20:32+5:30
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तापमानात वेगाने बदल झाला आहे.
सातारा : जिल्ह्यातून थंडी गायब होत असून कमाल तापमान ३५ अंशावर जात आहे. यामुळे यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता लवकरच अनुभवयास मिळणार आहे.
जिल्ह्यात हिवाळी ऋतुत थंडीचे प्रमाण अधिक जाणवलेच नाही. कारण, डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता; पण किमान तापमान कधीही ११.०७ अंशाच्या खाली आले नाही. आता तर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे किमान तापमान वाढत चालले आहे. सध्या सातारा शहरातील किमान तापमान १५ अंशाच्या वर गेले आहे. परिणामी पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात थंडी जाणवते. पण, रात्रीच्या सुमारास उकाडा जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तापमानात वेगाने बदल झाला आहे. किमान तसेच कमाल तापमान वाढत चालले आहे. यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुपारच्या सुमारास तर चटका जाणवत आहे. मागील तीन दिवसांत सतत कमाल तापमान ३४ अंशावर राहिले. त्याचबरोबर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचाही पारा वाढत चाललाय. यामुळे थंडी गायब झाली असून ऊन वाढू लागले आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात तर कमाल तापमान १५ अंशावर आहे. तर कमाल तापमान ३५ अंशावर राहत आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे. आगामी तीन महिने उन्हाळ्याचे असून कमाल तापमान ४० अंशावर जाणार आहे.
सातारा शहरात नोंद कमाल तापमान
१५ फेब्रुवारी ३१.०८, १६ फेब्रुवारी ३१.०१, १७ फेब्रुवारी ३१.०२, १८ फेब्रुवारी ३२.०६, १९ फेब्रुवारी ३३.०२, २० फेब्रुवारी ३३.०१, २१ फेब्रुवारी ३४.०५, २२ फेब्रुवारी ३५.०१, २३ फेब्रुवारी ३४.०८ आणि २४ फेब्रुवारी ३४.०५