श्रीगणेश शेंडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:23+5:302021-09-09T04:46:23+5:30
वाई : मेटगुताड जिल्हा परिषद केंद्रशाळेचे उपशिक्षक श्रीगणेश शेंडे यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने ...
वाई : मेटगुताड जिल्हा परिषद केंद्रशाळेचे उपशिक्षक श्रीगणेश शेंडे यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आविष्कार फौंडेशन ही एक सामाजिक, शैक्षणिक संस्था असून, गेली पंधरा वर्षे कार्यरत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आदर्शवत कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव करण्यात येतो. श्रीगणेश शेंडे यांनी आपल्या सतरा वर्षांच्या शैक्षणिक सेवाकार्यात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा, क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरांवर चमकले आहेत. सध्या ते महाबळेश्वर तालुका क्रीडा समन्वयक म्हणून क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य मंचाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेत सहभाग नोंदवून आत्तापर्यंत तीनशेहून अधिक सन्मानपत्र मिळविली आहेत.
या सर्वच कार्याची दखल घेऊन श्रीगणेश शेंडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. उद्योजक डॉ. एम. बी. शेख, प्रा. भारत खराटे, संजय पवार यांच्याहस्ते श्रीगणेश शेंडे यांना गौरविण्यात आले. यावेळी मा. प्रभाकर हेरवाडे, सुरेश उगारे, आर. वाय. गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, सुचेता कलाजे उपस्थित होते.