म्हासुर्णे-चोराडे मार्ग खड्ड्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:37 AM2021-05-26T04:37:46+5:302021-05-26T04:37:46+5:30
पुसेसावळी : पाटण-पंढरपूर राज्य मार्गावरील म्हासुर्णे ते चोराडे हद्दीतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. म्हासुर्णे गावानजीकचा खड्डा वाहनचालकांचा कर्दनकाळ ...
पुसेसावळी : पाटण-पंढरपूर राज्य मार्गावरील म्हासुर्णे ते चोराडे हद्दीतील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. म्हासुर्णे गावानजीकचा खड्डा वाहनचालकांचा कर्दनकाळ ठरत आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.
म्हासुर्णे ते चोराडे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची खोली आता एक फुटापेक्षाही अधिक झालेली आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचल्यामुळे वाहनचालकांना खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने या राज्यमार्गाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे .
फोटो : २५ राजीव पिसाळ
म्हासुर्णे-चोराडे राज्यमार्गावरील म्हासुर्णे गावानजीक पडलेला खड्डा वाहनचालकांचा कर्दनकाळ ठरत आहे. (छाया : राजीव पिसाळ)