म्हसवडच्या छावणीत साडेतीन हजार जनावरे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:50 PM2019-01-05T23:50:33+5:302019-01-05T23:55:06+5:30

चारा, पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या जनावरांसाठी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने म्हसवडमध्ये चारा छावणी सुरू केली. यामध्ये चौथ्या दिवसापर्यंत साडेतीन हजार जनावरे दाखल झाले.

In the Mhaswad camp, three and a half animals enter | म्हसवडच्या छावणीत साडेतीन हजार जनावरे दाखल

म्हसवडच्या छावणीत साडेतीन हजार जनावरे दाखल

Next
ठळक मुद्देमाणदेशी फाउंडेशनचा पुढाकार : प्रत्येक जनावराला दररोज पंधरा किलो चारा, एक किलो पेंडची सोय

म्हसवड : चारा, पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या जनावरांसाठी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने म्हसवडमध्ये चारा छावणी सुरू केली. यामध्ये चौथ्या दिवसापर्यंत साडेतीन हजार जनावरे दाखल झाले. मेगासिटीच्या प्रशस्त व बंदिस्त खुल्या जागेतील छावणीत आश्रयास आलेल्या जनावरांना दररोज पंधरा किलो चारा, एक किलो पेंड, पाणी पुरवले जाते.

म्हसवडमध्ये १ जानेवारीला चारा छावणी सुरू झाली. हे समजल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी जनावरे घेऊन छावणीत मुक्कामी येऊ लागली आहेत. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामासह रब्बी पीक हंगामात पेरणी केलेली पिके पाणी टंचाईमुळे करपून गेली. परिणामी जनावरांसाठी चारा व पिण्याचे पाणी टंचाईची समस्या शेतकऱ्यांना भेडसावू लागली. यंदाच्या दुष्काळाची तीव्रता गंभीर होत चालली आहे. शासन पातळीवर जनावरांची छावणी सुरू केली जाईल, याची अपेक्षा शेतकºयांना होती. परंतु अद्यापही छावणी सुरू न झाल्यामुळे दुभती जनावरे विक्री करणे हाच एकमेव मार्ग शेतकºयांपुढे होता.
म्हसवड भागातील गावोगावच्या शेतकºयांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने चेतना सिन्हा यांनी जनावरांची चारा छावणी सुरूकरण्याचा निर्णय घेतला. शासकीय मदतीविना राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी सुरू केली. यामुळे भूकेने व्याकुळ होत चाललेल्या मुक्या जनावरांना दिलासा दिला आहे.

छावणी सुरू होताच गावोगावचे शेतकरी कुटुंबे जनावरांच्या सोबतच छावणीत मुक्कामी येऊ लागले आहेत. छावणीत टँकरने वेळोवेळी पुरेसा पाणीपुरवठा जनावरांच्या मुक्कामीस्थळी तोही खात्रीपूर्वक केला जात असल्यामुळे बालगोपाळासह शेतकरी कुटुंबे मुक्कामी येऊ लागली आहेत. जनावरांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने शेतकरी कुटुंबातील माणसे या छावणीत मुक्कामी आहेत. येत्या चार-पाच दिवसांत किमान दहा हजारांहून अधिक संख्येने जनावरे या छावणीत आश्रयास येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माण तालुका दुष्काळी जाहीर करून अनेक दिवस लोटले तरी दुष्काळी उपाय योजना अद्यापही माणवासीयांना न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहेत.

जनावरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
सध्या छावणीत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली असून, छावणीत दररोज मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल होत आहेत. येथे पशुधनाला मुबलक चारा व पाणी उपलब्ध होत असल्याने छावणीत येत्या काही दिवसांत जनावरांची लक्षणीय वाढ होणार आहे.
 

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जनावरांना चारा, प्यायला पाणी नाही. जनावरे दावणीवर उपाशीपोटी दिवस काढत होती. पण माणदेशी फाउंडेशनने चारा छावणी सुरू केल्याने लाख मोलाची जनवारे जगणार आहेत.
- नामदेव हुबाले, गंगोती (ता. माण)

म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनच्या वतीने चारा छावणी सुरू केली आहे. याठिकाणी शेतकरी जनावरे घेऊन दाखल होत आहेत.

Web Title: In the Mhaswad camp, three and a half animals enter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.