म्हसवडला पंधरा दिवसांत जम्बो कोविड सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:29 AM2021-06-06T04:29:25+5:302021-06-06T04:29:25+5:30

म्हसवड : ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या माध्यमातून सुरू असलेल्या १६ बेडच्या कोविड सेंटरमधील एका इमारतीमध्येच १५० बेडचे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व ...

Mhaswad will set up a Jumbo Covid Center in a fortnight | म्हसवडला पंधरा दिवसांत जम्बो कोविड सेंटर उभारणार

म्हसवडला पंधरा दिवसांत जम्बो कोविड सेंटर उभारणार

Next

म्हसवड : ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या माध्यमातून सुरू असलेल्या १६ बेडच्या कोविड सेंटरमधील एका इमारतीमध्येच १५० बेडचे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व विलगीकरण असे माण-खटाव दोन्ही तालुक्यांंतील लोकांसाठी नव्याने सुरू करण्यात येणार आहे. जम्बो कोविड सेंटरची पाहणी केली असून, १५ ते २० दिवसांत आम्ही म्हसवडकरांचे जम्बो कोविड सेंटर उभे करणार आहे’, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन कमिटीचे सदस्य माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर, माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, वैद्यकीय अधिकारी कोडलकर, डॉ. भारत काकडे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, आम्ही म्हसवडकर ग्रुपचे युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, राहुल मंगरुळे, डॉ. राजेंद्र मोडासे, डॉ. राजेश शहा, डॉ. रोहन मोडासे, प्रशांत दोशी, खंडेराव सावंत, अभिजित केसकर, प्रीतम तिवाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माण-खटावच्या जनतेसाठी माणमध्येच १५० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभे करण्याच्या सूचना केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हसवडमध्ये येऊन पाहणी करून शिक्कामोर्तब केले होते. उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सातारा जिल्हा बांधकाम विभागाचे दराडे यांनी म्हसवड येथील जम्बो कोविड सेंटरच्या जागेची पाहणी करून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना तत्काळ लाइट, इमारत, स्वतंत्र लाइटचा ट्रान्स्फार्मर आदींची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

चौकट..

आतापर्यंत सातशे ते आठशे रुग्णांचे जीव वाचले

माण-खटाव या दुष्काळी दोन तालुक्यांतील वाढती कोरोना बांधितांची संख्या व उपलब्ध बेडची संख्या यामुळे चांगल्या उपचाराची सोय या दोन तालुक्यांत नव्हती. सातारा ते म्हसवड ९५ किलोमीटर अंतर आजारी रुग्णांना नेणे धोक्याचे होते, अशा परिस्थितीत आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या युवकांना लोकवर्गणीतून १६ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करून सातशे ते आठशे रुग्णांचे जीव वाचवण्यात यश आले.

०५म्हसवड

फोटो - म्हसवड येथे जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधांबाबत अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सूचना केल्या. यावेळी अनिल देसाई, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Web Title: Mhaswad will set up a Jumbo Covid Center in a fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.