म्हसवडचे सिद्धनाथ मंदिर दर्शनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:56+5:302021-04-10T04:38:56+5:30
म्हसवड : लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार ...
म्हसवड : लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याची माहिती श्री सिद्धनाथ देवस्थानचे अध्यक्ष हरिभाऊ गुरव, उपाध्यक्ष, महेश गुरव व सचिव दिलीप कीर्तने यांनी दिली.
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, मराठवाडा, मध्य प्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेले येथील श्री सिद्धनाथ मंदिर कोरोनाच्या दुसऱ्या अत्यंत गंभीर अशा लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशानुसार सोमवार, दि. ५ एप्रिलपासून भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे.
शासकीय आदेशानुसार मंदिरातील श्रींचे, अभ्यंग स्नान, पूजा, आरती आदी दैनंदिन धार्मिक विधी मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत अंतर्गत पद्धतीने करण्यास पूर्वीप्रमाणेच परवानगी असून दिवसभर बाहेरील भाविक, भक्त, ग्रामस्थ, सेवेकरी, मानकरी आदी कोणालाही श्रींच्या दर्शनासाठी मनाई करण्यात आली असून, सध्या हे मंदिर कुलूपबंद ठेवण्यात आले आहे.
तरी ग्रामस्थ, सेवेकरी, मानकरी, भक्त आणि भाविकांनी शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करून मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.