रथोत्सवासाठी सजली म्हसवडनगरी

By admin | Published: November 21, 2014 11:44 PM2014-11-21T23:44:41+5:302014-11-22T00:09:13+5:30

उद्या ‘चांगभलं’ : निशाणे, पेढे तयार करण्यात कारागीर झाले मग्न

Mhaswāngaसाठीi for Rathhotsav | रथोत्सवासाठी सजली म्हसवडनगरी

रथोत्सवासाठी सजली म्हसवडनगरी

Next

म्हसवड : येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू असून, श्री सिद्धनाथ रथोत्सव रविवारी (दि. २३) होत असून, यानिमित्त मिठाई व इतर साहित्याची दुकाने थाटली आहेत.
श्री सिद्धनाथ रथोत्सवासाठी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यांमधून सुमारे ५ ते ६ लाख भाविक हजेरी लावतात. यंदाही या यात्रेस मोठ्या संख्येने भाविक येतील असा अंदाज असून, यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि व्यापारीही तयारीला लागले आहेत. यात्रेच्या नियोजनाची मुख्य जबाबदारी म्हसवड पालिकेकडे असून, पालिका प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात्रा पटांगणाची स्वच्छता, यात्रेकरू व हॉटेलांसाठी पाणीपुरवठा, दुकानांसाठी जागा, यात्रा पटांगणावर दिवाबत्तीची सोय ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर औषधांची फवारणी करण्यात आली. शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी यात्रा ‘फ्लेक्सविरहित’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mhaswāngaसाठीi for Rathhotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.