म्हैसाळ भ्रूणहत्याकांड; चौकशी अधिकारी बदलला
By admin | Published: March 11, 2017 09:51 PM2017-03-11T21:51:37+5:302017-03-11T22:01:18+5:30
मुंडे व पालकमंत्री देशमुख यांनी म्हैसाळ गावास भेट दिली नाही.
सांगली : राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ भ्रूणहत्याकांडाची चौकशी करणारा अधिकारी तडकाफडकी बदलण्यात आला आहे. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, डॉक्टर असलेल्या महिला पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांची आम्ही चौकशी अधिकारी म्हणून नव्याने नियुक्ती केली आहे. काळे या डॉक्टर असून महिला अधिकारी म्हणून त्यांचा तपासात अधिक फायदा होऊ शकतो. अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता आम्ही घेऊ. भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत. जनजागृती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचा काही परिणाम होत नाही, अशी टीका करणे योग्य नाही. सर्व घटकांनी त्यांचे योगदान दिले तरच योजना यशस्वी होतील, असेही मुंडे म्हणाल्या. (प्रतिनिधी) .
.. म्हैसाळला भेट नाही... मुंडे व पालकमंत्री देशमुख यांनी म्हैसाळ (ता. मिरज) गावास भेट दिली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यामुळे नागरिकांमधून टीकेचा सूर होता.