Earthquake: कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का!
By प्रमोद सुकरे | Published: October 28, 2022 12:10 PM2022-10-28T12:10:11+5:302022-10-28T12:12:12+5:30
प्रमोद सुकरे कराड : कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) येथील कोयना धरण परिसरात भुकंपाच्या सौम्य धक्का जाणवला. आज, शुक्रवारी ...
प्रमोद सुकरे
कराड : कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) येथील कोयना धरण परिसरात भुकंपाच्या सौम्य धक्का जाणवला. आज, शुक्रवारी सकाळी ६ :३४ वाजता भूकंपाचा हा सौम्य धक्का बसला.
शुक्रवारी सकाळी ६:३४ वाजता कोयनानगर पासून ८ किलोमीटर अंतरावर २.८ रिश्टर स्केलचा हा धक्का जाणवला. कोयना व पोपळी या परिसरात याची जाणीव झाली. या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली ७ किलोमीटर होती. कोयना खोऱ्यात हेळवाक गावाच्या नैऋत्येला ५ किलोमीटर अंतरावर याचा केंद्रबिंदू होता. भुकंपाचा धक्का कोयना परिसरात जाणवला.
या भुकंपाच्या धक्क्याने कोणतीही वित्तहानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.