हरणाई सूतगिरणी सहकार क्षेत्रातील माईल स्टोन : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:42 AM2021-05-25T04:42:46+5:302021-05-25T04:42:46+5:30

औंध : संपूर्ण राज्याला आदर्श ठरणारी हरणाई सहकारी सूतगिरणी सहकार क्षेत्राला माईल स्टोन ठरली असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री तथा पालकमंत्री ...

Milestone in the field of Harnai Spinning Co-operative: Patil | हरणाई सूतगिरणी सहकार क्षेत्रातील माईल स्टोन : पाटील

हरणाई सूतगिरणी सहकार क्षेत्रातील माईल स्टोन : पाटील

googlenewsNext

औंध : संपूर्ण राज्याला आदर्श ठरणारी हरणाई सहकारी सूतगिरणी सहकार क्षेत्राला माईल स्टोन ठरली असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

येळीव (ता. खटाव) येथील हरणाई सहकारी सूतगिरणीच्या सदिच्छा भेटीप्रसंगी पाटील बोलत होते. हरणाई उद्योग समुहाचे संस्थापक काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, धामणेरचे माजी सरपंच शहाजी क्षीरसागर, आप्पासाहेब देशमुख, सपोनि. उत्तम भापकर, जनरल मॅनेजर रमेश भोसले, अजित घाडगे, नीलेश घार्गे व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, २५ कोटी ६१ लाख रुपयांचे कर्ज मुदतपूर्व नियमित परतफेड करणाऱ्या विक्रमी उत्पादनासह फायदेशीररित्या चालविण्यात येणारी हरणाई सहकारी सूतगिरणी राज्यात आदर्शवत ठरली आहे. १३ हजार ७२८ चाती असलेल्या हरणाई सूतगिरणीचा निसर्गरम्य, स्वच्छ परिसर व उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हा दुष्काळी पट्ट्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प सहकार क्षेत्राला निश्चितच दिशादर्शक ठरला असल्याचा विश्वास व्यक्त करून पाटील यांनी १२००० चाती असणाऱ्या विस्तारित सूतगिरणीच्या कामाची पाहणी केली.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, हरणाईचा सहप्रकल्प फळबाग लागवड व अडीच एकर क्षेत्रावरील मत्स्य उद्योग प्रकल्प तरूण पिढीला दिशादर्शक ठरेल. पालकमंत्री पाटील यांनी दुष्काळी खटाव - माणमध्ये मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प व पूरक लघुउद्योगास चालना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सूत्रसंचालन सयाजी सुर्वे यांनी केले, तर रमेश भोसले यांनी आभार मानले.

फोटो:-

हरणाई सहकारी सुतगिरणीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करताना रणजितसिंह देशमुख, डॉ. एम. आर .देशमुख आदी.

===Photopath===

240521\img-20210521-wa0507.jpg

===Caption===

फोटो:-हरणाई सूतगिरणीच्या सदिच्छाभेटीप्रसंगी ना.बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करताना रणजितसिंह देशमुख, डॉ. एम आर.देशमुख आदींसह उपस्थित होते(छाया-रशिद शेख)

Web Title: Milestone in the field of Harnai Spinning Co-operative: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.