गोळीबार करून पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:16 PM2017-08-12T23:16:46+5:302017-08-12T23:16:49+5:30

Militant gang ransacking petrol pump | गोळीबार करून पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

गोळीबार करून पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड/वडगाव हवेली : सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार करीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकला. कर्मचाºयांना मारहाण करून त्यांनी २५ हजारांची रोकडही लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून कºहाडात पकडले. वडगाव हवेली, ता. कºहाड येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दरोड्याची घटना घडली.
अक्षय भारत कावरे (रा. अपशिंगे, ता. कडेगाव, जि. सांगली), अनमोल जीवनसिंग शर्मा (रा. हसी, जि. हिसार, हरियाणा), दीपक रामराज गर्ग (रा. पैकरहेडी, ता. जिंद, हरियाणा), ईश्वरसैनी राजकुमारसैनी (रा. पिहोवा, जि. कुरुक्षेत्र, हरियाणा) व महेंद्र सूर्यग्यान गुजर (रा. बाबूधाम, चाणक्यपुरी, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. या पाचजणांबरोबर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड-तासगाव मार्गावर वडगाव हवेली हद्दीत दीपक जोशी यांचा पेट्रोलपंप आहे. दीपक जोशी यांच्यासह कर्मचारी मल्लिकार्जुन बिराजदार, तुषार सागरे व परमेश्वर शेळके शुक्रवारी रात्री पंपावर होते. हे चौघे रात्री साडेअकराच्या सुमारास पंपाच्या आॅफिसजवळ कट्ट्यावर गप्पा मारत बसले असताना दोन दुचाकीवरून पाचजण त्याठिकाणी आले. एकाने दुचाकीवरून खाली उडी मारून कर्मचाºयांच्या दिशेने पिस्तूल रोखली. गोळीबार करीत त्याने कर्मचाºयांवर दहशत निर्माण केली. अन्य तिघेजण हातात तलवार व चाकू घेऊन कर्मचाºयांजवळ आले. त्यांनी कर्मचाºयांना तेथून उठवून पंपाच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी दीपक जोशी यांच्यासह कर्मचाºयांना मारहाण करण्यात आली. तसेच २२ हजार ३१५ रुपयांची रोकड व १२ हजार रुपये किमतीचे मोबाईल घेऊन दरोडेखोर दुचाकीवरून तासगावच्या दिशेने पसार झाले. घटनेनंतर दीपक जोशी यांनी तातडीने स्वत:च्या कारमधून दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. ते शेणोली गावापर्यंत पोहोचले. तेथून दरोडेखोर सोनसळ घाटमार्गे नेर्लेकडे गेल्याचे जोशी यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून फोन करून याबाबतची माहिती कºहाड पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे सातारा व सांगली जिल्ह्यांतील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रात्रगस्तीवर असणाºया पोलीस वाहनांना संबंधित दुचाकींचा पाठलाग करण्यास सांगण्यात आले. दरम्यान, वडगाव हवेलीतून तासगाव रस्त्याने पोबारा केलेले दरोडेखोर शेणोली स्टेशनमधून सोनसळ घाटमार्गे कºहाड-विटा रोडवर पोहोचले. तेथून ते सुर्ली घाटातून परत कºहाड शहराच्या दिशेने आले. ओगलेवाडी येथे रात्रगस्तीसाठी असणारे सहायक फौजदार दीपक साळुंखे व हवालदार किरण बामणे यांनी दुचाकीच्या क्रमांकावरून दरोडेखोरांना ओळखले. मात्र, ते दुचाकी अडविण्याच्या प्रयत्नात असतानाच दरोडेखोर तेथून सुसाट पुढे आले. कृष्णा कॅनॉलवर हवालदार गणेश देशमुख व मोहित गुरव नाकाबंदीसाठी होते. त्यांनी धाडसाने दरोडेखोरांच्या दुचाकी अडविल्या. ते संशयितांकडे चौकशी करीत असतानाच पोलीस जीप त्याठिकाणी पोहोचली. पोलिसांनी दुचाकीवरील पाचजणांना ताब्यात घेतले. तसेच दुचाकीची झडती घेण्यात आली. त्यावेळी वडगाव हवेलीतील पंपातून लुटलेली रोकड व मोबाईल आढळून आले.
संशयितांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी वडगाव हवेलीतील दरोड्याच्या गुन्ह्यासह काही दिवसांपूर्वी कडेगाव येथील पेट्रोलपंपावर टाकलेल्या दरोड्याची कबुली दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच या टोळीतील अन्य एकजण शहरातील कोयना लॉजमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी त्या लॉजवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. याबाबतची नोंद कºहाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत.

Web Title: Militant gang ransacking petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.