दुधाची खरेदी-विक्री होतेय सहा फुटांवरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:10+5:302021-06-10T04:26:10+5:30
कोपर्डे हवेली : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असतानाच कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) ...
कोपर्डे हवेली : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असतानाच कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील दूध डेअरी सोसायटीने वेगळी शक्कल लढवून दुधाची खरेदी-विक्री सहा फुटांच्या अंतरावर सुरू करून सोशल डिस्टन्स ठेवले आहे.
ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. त्यामुळे दूध उत्पादक संस्थेत सकाळी आणि सायंकाळी दूध घालण्यासाठी गर्दी होत असते.
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सचा वापर केला जातो. दूध डेअरीसमोर रांगा लागलेल्या दिसतात. काही वेळेस सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतो, हे टाळण्यासाठी कोपर्डे हवेली दूध डेअरी सोसायटीने एक इंच सहा फूट लांबीच्या पाईपचा वापर करून दूध घेतले जाते व दुसऱ्या पाईपमधून ग्राहकाला विकले जाते. शिल्लक दूध कोयना दूध संघाला पाठविले जाते.
सहा फूट अंतरावर चौकाेनी आकाराचे भांडे बसवले आहे. त्याला एक इंची पीव्हीसी पाईप जोडला आहे. त्यामध्ये दूध ओतले जाते ते दूध कॅनात पडते व त्याच ठिकाणी फॅट घेतली जाते. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने ग्राहकाला दुधाची विक्री केली जाते. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा वापर केला जातो. शिवाय लोकांची गर्दी होत नाही. कर्मचारी सॅनिटायझरचा आणि मास्कचा वापर करतात.
(कोट)
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सचा वापर करण्यासाठी पीव्हीसी पाईपचा वापर करून सहा फूट अंतरावरून दूध घेतले जाते. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवले जात आहे.
-सुदाम चव्हाण, मार्गदर्शक, कोपर्डे हवेली दूध डेअरी सोसायटी
(चौकट येणार आहे..)
फोटो ओळ... कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील दूध डेअरी सोसायटीने दूध घेण्यासाठी शक्कल लढविली आहे. (छाया :-------)