दूध, कांदे ओतून शासनाच्या नावानं शिमगा!

By admin | Published: June 4, 2017 10:36 PM2017-06-04T22:36:33+5:302017-06-04T22:36:33+5:30

दूध, कांदे ओतून शासनाच्या नावानं शिमगा!

Milk, onion will shake the name of the government! | दूध, कांदे ओतून शासनाच्या नावानं शिमगा!

दूध, कांदे ओतून शासनाच्या नावानं शिमगा!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेती व्यवसायातील अडचणी सरकारच्या समोर मांडण्यासाठी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे तरुण शेतकऱ्यांनी दूध आणि कांदे रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करीत बोंबाबोंब आंदोलन केले. खंडाळा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, खंडाळ्याचा आठवडी बाजाराकडे पाठ फिरवून शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला.
रविवारी पारगाव येथे सकाळी ११.३० वाजता तरूण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दुधाचे कॅन तसेच कांद्याच्या पिशव्या रस्त्यावर ओतल्या. यावेळी भाजपा सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दडपण्याचे काम सरकार करत असल्याची चर्चा सुरु होती.
घरोघरी दुधाचे वाटप
भादे याठिकाणीही शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपल्या भावना व्यक्त केल्या. शेकडो लोकांनी एकत्र येवून निषेध नोंदवला. बहुतांशी गावातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल व्यापाऱ्यांपर्यंत पोहचवलाच नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना चारदिवस हातावर हात ठेवून बसावे लागले. जवळे या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध डेअरीवर न घालता इतर शेतकऱ्यांच्या घरी नेऊन वाटून अनोख्या पद्धतीने संपाला प्रतिसाद दिला.
शहरात दिवसभर शुकशुकाट
खंडाळ्याचा दर रविवारी आठवडा बाजार भरतो. मात्र, शेतकरी संपाच्या पार्शभूमीवर आजच्या बाजाराकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याने व्यापारीही आले नाहीत. त्यामुळे बाजार दिवसभर बंद राहिला तर काही दुकानदारांनीही या संपाला पाठिंबा दर्शवत बंद पाळला . त्यामुळे खंडाळा शहरात दिवसभर शुकशुकाट होता.
शेतकऱ्यांचा दिवस शिवारातच
अंदोरी येथील एकाही शेतकऱ्याने शेतीमधून भाजीपाला काढला नाही. अंदोरी येथून मुंबई येथील बाजारात दररोज भेंडीची किमान १०० कॅरेट जातात. मात्र आजपर्यंत एकही कॅरेट भरले गेले नाही. अंदोरी आणि पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठेत पाठवला जातो. मात्र शेतकरी संपामुळे शेतकऱ्यांनी दिवसभर शेतातील इतर कामात वेळ घालवला.

Web Title: Milk, onion will shake the name of the government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.