धोम उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:11+5:302021-03-17T04:41:11+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील सायगाव येथे मंगळवारी धोम उजवा कालवा फुटला. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. आसपासच्या शेतात ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील सायगाव येथे मंगळवारी धोम उजवा कालवा फुटला. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. आसपासच्या शेतात पाणी शिरल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जावळी तालुक्यात शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी धोम उजव्या कालव्याची निर्मिती झाली. सायगावजवळ कालव्यावरील पुलाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता भगदाड पडून कालवा फुटला. यामध्ये लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतीचेही नुकसान झाले आहे. या घटनेपूर्वी या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी वारंवार पाटबंधारे विभागाकडे मागणीही केली होती. मात्र, याची दखल घेतली नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली असे शेतकऱ्यांनी सांगितले. यात शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याची नुकसानभरपाई द्यावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.
फोटो
१६धोम
जावळी तालुक्यातील सायगाव येथे मंगळवारी धोम-उजवा कालवा फुटला. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. (छाया : विशाल जमदाडे)