कोट्यवधींचे नुकसान : उंब्रज परिसरातील व्यावसायिक हवालदिल
By admin | Published: March 11, 2015 10:54 PM2015-03-11T22:54:49+5:302015-03-12T00:05:49+5:30
कोट्यवधींचे नुकसान : उंब्रज परिसरातील व्यावसायिक हवालदिल
उंब्रज : बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पडलेल्या पावसामुळे उंब्रज व परिसरातील वीट व्यवसायाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.उंब्रजकरांचा मुख्य व्यवसाय हा वीट व्यवसाय आहे. उंब्रज व परिसरात २०० ते २५० वीट व्यवसाय आहेत. वीट तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होता. विटाळ्याच्या साह्याने कच्ची वीट तयार होती. लाखो कच्च्या विटा मंगळवारी फडात होत्या. तर लाखो विटा वाळण्यासाठी विटाच्या उभ्या खंडागी होत्या. मंगळवारी दुपारपर्यंत वातावरण चांगले होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. यामध्ये फडातील कच्ची वीट पाण्याने विरघळून त्याची परत माती झाली. तर उभ्या खंडांग्या जाग्यावर बसल्या. यामुळे कच्ची वीट तयार करण्यासाठी करण्यात आलेला सर्व खर्च मातीमोल झालाच, त्यामध्ये येथील सर्व वीट व्यावसायिकाचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले.
काही वर्षांपासून येथील वीट व्यावसायिक अनेक कारणांनी आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच
निसर्ग कोपल्यामुळे येथील
शेकडो वीट व्यावसायिक आर्थिक संकटाच्या खाईत पुन्हा अडकले आहेत. (प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने आम्हा व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे. शासनाने याची दखल घेऊन आम्हाला आर्थिक नुकसान देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-प्रशांत होळकर,
वीटभट्टीधारक
बँकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. कच्चा माल चांगल्या प्रतीचा तयार केला. भट्टी पेटवण्यापूर्वीच अवकाळी पावसाने भट्टीतील कच्चा माल मातीमोल करून टाकलाय.
- अर्जुन चव्हाण,
वीटभट्टीधारक