कोम्बिग ऑपरेशनमध्ये लाखोंचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:53+5:302021-02-15T04:34:53+5:30

सातारा : शहरालगत असणाऱ्या प्रतापसिंहनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कोम्बिग ऑपरेशन दरम्यान पोलिसांना ...

Millions of materials seized in combing operation | कोम्बिग ऑपरेशनमध्ये लाखोंचे साहित्य जप्त

कोम्बिग ऑपरेशनमध्ये लाखोंचे साहित्य जप्त

Next

सातारा : शहरालगत असणाऱ्या प्रतापसिंहनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कोम्बिग ऑपरेशन दरम्यान पोलिसांना अनेकांच्या घरात काही संशयास्पद साहित्य सापडले. मात्र, यातील काही संबंधितांना त्याची मालकी सिद्ध करता आली नाही, अशा संशयितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून ते साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमसह अन्य पोलिसांनी प्रतापसिंहनगर झोपडपट्टीत कोम्बिग ऑपरेशन राबविले होते. यावेळी अभिलेखावरील गुन्हेगार, तडीपार तसेच मोक्का लावण्यात आलेले गुन्हेगार कोण आहेत आणि त्याचे आताचे लोकेशन नेमके प्रतापसिंहनगर आहे की अन्य कोणते आहे, याचा शोध घेण्यात आला. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या काही इमारतींमधील लोखंडी साहित्य काढून नेण्याच्या तक्रारीही झाल्या होत्या. त्यामुळे तेथील काही साहित्य येथे आढळून येते का, याचा शोध घेण्यात आला. राज्याच्या गृहमंत्रालयानेही याबाबतची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

प्रतापसिंहनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवाजी लिंबा कांबळे (वय ५२) याच्याकडे २० हजार ८00 रुपयांचे साहित्य आढळून आले. मात्र, त्यालाही त्याची माहिती समाधानकारकपणे देत त्याची मालकी सिद्ध करता आलेली नाही.

आकाश दत्तात्रय जाधव (वय २६) याच्या घरी २२ हजार ५०० रुपयांचे साहित्य आढळले आले. सचिन बळीराम भिसे (वय ३५) याच्या ताब्यात २७ हजार ५०० रुपयांचे साहित्य, रमेश भिवा सकट याच्याकडे १३ हजार २०० रुपयांचे साहित्य, सुनील विष्णू कांबळे (वय २४) याच्याकडे २१ हजार १०० रुपयांचे साहित्य आढळले आले. या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Millions of materials seized in combing operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.