पाचटापासून मिळणार लाखोंचे सेंद्रिय खत!

By Admin | Published: December 7, 2015 10:24 PM2015-12-07T22:24:11+5:302015-12-08T00:31:27+5:30

साबळे यांचा वाडे परिसरात प्रयोग :

Millions of organic fertilizer to be obtained from the fifth house! | पाचटापासून मिळणार लाखोंचे सेंद्रिय खत!

पाचटापासून मिळणार लाखोंचे सेंद्रिय खत!

googlenewsNext

रासायनिक खते अन् पाण्याच्या अतिरेकी वापराने कमी होणारा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्नशेतकऱ्यांसाठी कोट्यवधीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा विशेष ओढा आहे. चांगले उत्पन्न मिळावे म्हणून भरमसाठ रासायनिक खताची मात्रा व पाणी दिले जाते. यामुळे जमिनीचा पोत कमी होतो याकडेमात्र दुर्लक्ष केले जाते. कमी खर्चात अन् नैसर्गिक पद्धतीने उसाचे उत्पादन मिळविण्यासाठी उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मितीचा प्रयोग राबविला जाऊ लागला आहे.
पाण्याच्या अती वापरामुळे जमिनीचा पोत कमी होत असून, उत्पन्न घटत चालले आहे. तीस वर्षांपासून शेतकरी उसाचे पाचट जाळत आले आहेत. जमिनीचा सामू ८.५० च्या वर गेला आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर ऊस पिकाखालील जमीन क्षारपड होण्याचा धोका कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शेतीच्या संदर्भात सातारा तालुक्यातील वाढेचे कृषी सहायक अधिकारी आर. एस. साबळे यांनी काही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याचा प्रयोग करत आहेत.
शेतकरी आजवर उसाचे पाचट जाळत आले आहेत. त्यांनी पाचटाकडे विशेष लक्षच दिलेले नाही. याचा विचार करून साबळे यांनी पाचटाचे अर्थकारण केले आहे. यामध्ये वाढे गावात २५० एकर उसाचे क्षेत्र आहे. त्यातून दरवर्षी एक हजार टन पाचट मिळते. बाजार पेठेत सेंद्रिय खताचा दर प्रती टन चार हजार असल्याने या पाचटापासून सेंद्रिय खत तयार केल्यास चाळीस लाख रुपये किमतीचे सेंद्रिय खत तयार करू शकतो असा त्याचा दावा आहे. याप्रमाणेच खेड येथे दोनशे एकर क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यातून आठशे टन पाचट मिळत आहे. यापासून सेंद्रिय खत तयार केल्यास ३२ लाखांचे सेंद्रिय खत तयार करता येऊ शकते. संगम माहुली येथे शंभर एकर क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जाते. तेथेही चारशे टन पाचट तयार होते. त्यातून सोळा लाखांचा सेंद्रिय खत जाळत आहे. हे टाळण्यासाठी साबळे हे जनजागृती करत आहेत.


सर्व सरी पाचट पद्धती :
या पद्धतीमध्ये सर्व सऱ्यांमध्ये पाचट ठेवून उसाचे खुंट उघडे केले जातात व सरीत जेथून पाणी दिले जाते तेथील ५ ते ६ फूट अंतरावरील पाचट काढले जाते व खते दान हप्त्यात पहारीने दिली जातात. कोणत्याही परिस्थितीत खते फेकून देऊ नयेत.

सरी आड सरी पाचट पद्धत :
या पद्धतीमध्ये सरी आड सरी पाचट दाबले जाते व जी सरी मोकळी होते त्या सरीतून खते व पाणी देता येतात. दोन मजूर एका दिवसात एक एकराची दाताळ्याने सरी आड सरी/पाचट करु शकतात. ज्यावेळी ऊस तोडीच्या वाहनामुळे सरी वरंबा सपाट झालेले असतात व पाणी देण्याची अडचण होते. अशा वेळी या पद्धतीचा वापर करावा.

उसाच्या पट्ट्यात पाचट कुजविणे :
या पद्धतीमध्ये २:१ या पद्धतीने उसाची लागवड केलेली असते व पट्ट्यात पाचट दाबले जाते आणि मोकळ्या सरीतून खते व पाणी देता येतात.

यांत्रिक पद्धत :
या पद्धतीमध्ये सर्व पाचट शेतातच ट्रॅक्टरला जोडलेल्या औजारांच्या साह्याने बारीक केले जाते व नंतर वापरले जाते.

खड्डा पद्धत :
या पद्धतीमध्ये सर्व पाचट प्लॉटच्या बाहेर काढून खड्ड्यात टाकून कुजविले जाते व नंतर वापरले जाते.

उसाचे पाचट हे ऊस शेतीला वरदान असून, गेली ५ वर्षे मी ४ एकरामध्ये पाचट न जाळण्याचा प्रयोग केला आहे. याच्यातून कमीत कमी भांगलण, पाणी व खत यांच्यावरील खर्चात ६० टक्के व ७० टक्के बचत झाली आहे. खर्चाचे पर्यायाने फायद्यात रुपांतर झाले आहे. एवढेच नव्हेतर सातत्याने प्रयोग केल्यामुळे माझी शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती झाली आहे.
- जगन्नाथ मुगुटराव नलावडे, वाढे


जगदीश कोष्टी

Web Title: Millions of organic fertilizer to be obtained from the fifth house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.