खाण व्यावसायिकाकडून तहसीलदारांना दमदाटी-एकाव गुन्हा : अनाधिकृत खाणीचे काम रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 06:15 PM2019-07-06T18:15:58+5:302019-07-06T18:23:13+5:30
अनाधिकृतपणे खाणीचे खोदकाम रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आशा होळकर यांना खाण व्यावसायिकाने दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेंद्रे
सातारा : अनाधिकृतपणे खाणीचे खोदकाम रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार आशा होळकर यांना खाण व्यावसायिकाने दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास शेंद्रे परिसरात घडली. या प्रकरणी खाण व्यावसायिक रणजित विलासराव उंबरे (रा. सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे येथील सर्व्हिस रस्त्यालगत अनाधिकृतपणे खाणीचे खोदकाम सुरू असल्याची माहिती साताºयाच्या तहसीलदार आशा होळकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाºयांसह तेथे धाव घेतली. रात्री अकराच्या सुमारास तहसीलदार होळकर तेथे पोहोचल्यानंतर ‘तुम्ही एवढ्या रात्री येथे का आलाय, माझ्या खासगी प्रॉपर्टीमध्ये येण्याचा तुम्हाला अधिकार नसून मी तुम्हाला येथून पोकलॅन नेऊ देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे बोलून तहसीलदार आशा होळकर यांना दमदाटी केली.
तसेच पोकलॅन हे कंटेनरमध्ये भरून न देता शासकीय कामात अडथळा आणला. मात्र, तरीही तहसीलदार होळकर यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने पोकलॅन जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकारानंतर शेंद्रेचे मंडलाधिकारी नितीन घोरपडे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.