इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:21+5:302021-05-20T04:43:21+5:30

मलकापूर : कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर येथे इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस ...

A minor boy was killed after falling from a building | इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलगा ठार

इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलगा ठार

Next

मलकापूर : कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर येथे इमारतीवरून पडल्याने अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

वेदांत भगवान साळुंखे (वय अंदाजे १४, सध्या रा. आदर्श शाळेजवळ, आगाशिवनगर, मूळ रा. संजयनगर, काले, ता. कऱ्हाड) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवान साळुंंखे हे आगाशिवनगर येथे एका वर्कशॉपमधे काम करतात. बुधवारी सकाळी त्यांचा मुलगा वेदांत आदर्श शाळेजवळच्या इमारतीवरून खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. सध्या या घटनेची आकस्मिक मृत म्हणून पोलिसांत नोंद झाली आहे.

Web Title: A minor boy was killed after falling from a building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.