राजकारण विसरून कामे करणे मिरढेकरांचे वैशिष्ट्य् : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:56+5:302021-07-18T04:27:56+5:30
वाठार निंबाळकर : ‘निवडणूक झाली की राजकारण विसरून विकासकामे करण्यासाठी एकत्रित येणे ही मिरढे गावातील परंपरा इतर गावांसाठी प्रेरणादायी ...
वाठार निंबाळकर : ‘निवडणूक झाली की राजकारण विसरून विकासकामे करण्यासाठी एकत्रित येणे ही मिरढे गावातील परंपरा इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
मिरढे येथील ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन, मिरढे ते शिंदेवाडा रस्ता भूमिपूजन, प्राथमिक शाळा कंपाऊंड भूमिपूजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष गणेश दडस, माजी सरपंच संगीता लोंढे, सरपंच नामदेव काळे, उपसरपंच संगीता यादव उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘मिरढे गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे शंभराहून अधिक रुग्ण होते. मात्र गावाची एकी असल्याने उत्तम नियोजन करून या महामारीमध्ये गाव कोरोना मुक्त करण्यासाठी ग्रामस्थ यशस्वी झाले. मिरढे गावाने तीस वर्षे राजकारण करताना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. राजकारण करताना विकास ही मोठ्या प्रमाणात करून गाव आदर्श करण्यात ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. यापुढेही गावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’
यावेळी माणिकराव सोनवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. बजरंग कचरे, बापूराव पोकळे, संजय कचरे, तानाजी गावडे, शंकर गायकवाड, रमेश लोंढे, चांगदेव पोकळे, ज्ञानदेव गावडे, सुभाष यादव, ग्रामसेविका व्ही. आर. सोनवणे, सदस्य कुंडलिक चव्हाण, नवनाथ यादव, रूपाली मदने, साधना जगताप, मोनाली शेंडगे, भीमराव कचरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच नामदेव काळे यांनी स्वागत केले. भागवत काशीद यांनी आभार मानले.