साताऱ्यामध्ये गणपती विसर्जनावेळी अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:09 PM2017-09-06T15:09:30+5:302017-09-06T16:21:44+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या एका सहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामदास चंद्रकांत फाळके याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या एका सहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामदास चंद्रकांत फाळके याच्या विरोधात कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरु झाली. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अल्पवयीन मुलगी व तिच्या समवयस्क दोन मैत्रिणींसमवेत गेल्या होत्या. तिघी मुली गणेश मूर्ती असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेल्या होत्या. त्याचवेळी रामदास फाळके याने लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन या मुलीबरोबर केले, तिने विरोध केला व बसण्याची जागा बदलली, मात्र पुन्हा फाळके हा तिच्याशेजारी जाऊन बसला.
मिरवणुकीनंतर संबंधित मुलीने घरात येऊन आई व वडिलांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फाळके याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे तपास करत आहेत.