Gram Panchayat Election Result: खेड ग्रामपंचायतीवर महेश शिंदे गटाचे वर्चस्व, राष्ट्रवादीला धक्का
By दीपक शिंदे | Published: September 19, 2022 01:49 PM2022-09-19T13:49:04+5:302022-09-19T14:04:53+5:30
मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल दिला कौल
दीपक देशमुख
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सातारा जिल्ह्यातही काही ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यातील खेड ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यात मुख्यमंत्री एकनाद शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का देत बाजी मारली आहे.
सातारा तालुक्यातील महत्वपूर्ण अशा खेड ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल कौल दिला आहे. या ठिकाणी सरपंचपदी लता फरांदे यांनी बाजी मारली आहे. तर 12 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या ग्राम विकास पॅनल पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.
राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान रविवारी पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी ७६ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज सोमवारी होत आहे.
विजयी उमेदवार असे
परिवर्तन पॅनल (आमदार महेश शिंदे)
सरपंचपदी - लता फरांदे
सदस्य- विनोद माने, सुलभा लोखंडे, संतोष शिंदे, सुधीर काकडे, स्मिता शिंदे, सुमन गंगणे, शरद शेलार, वंदना गायकवाड, शामराव कोळपे, प्रियांका संकपाळ, चंद्रभागा माने
ग्रामविकास पॅनल (आमदार शशिकांत शिंदे)
कांतीलाल कांबळे, सुशीला कांबळे, फरांदे, यादव