आमदारांची सरशी; ‘आमचं ठरलंय’ही पॉवरफूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:23+5:302021-01-19T04:40:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दहिवडी : माण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून, आमदार जयकुमार गोरे यांची सरशी झाली असून ...

MLA's Sarshi; ‘We have decided’ is powerful! | आमदारांची सरशी; ‘आमचं ठरलंय’ही पॉवरफूल !

आमदारांची सरशी; ‘आमचं ठरलंय’ही पॉवरफूल !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

दहिवडी : माण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून, आमदार जयकुमार गोरे यांची सरशी झाली असून ‘आमचं ठरलंय’ आघाडीही पॉवरफूल ठरली. तर तालुक्यातील आठ गावांत सत्तांतर झाले. शेखर गोरे यांचा या निवडणुकीत कोठेही करिश्मा दिसून आला नाही.

माण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने झाल्या. आमदार जयकुमार गोरे यांच्या गटाने तालुक्यामध्ये १८ ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता मिळवली, तर काही ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीशी युती करून तालुक्यात निर्विवाद यश मिळवले. तर राष्ट्रवादी काँग्रेस व ‘आमचं ठरलंय’ गटाच्या ताब्यात १४ ग्रामपंचायती आल्या. त्याचबरोबर स्थानिक आघाड्यासोबतही ‘आमचं ठरलंय’ गटाला काही ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली आहे. शेखर गोरे यांचा या निवडणुकीत कोठेही करिश्मा दिसला नाही. त्यांना बोथे वगळता एकहाती एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही. त्यामुळे आगामी काळात शेखर गोरेंना ठाम राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे.

माण तालुक्याचा राजकीयदृष्ट्या विचार करता आमदार जयकुमार गोरे यांनी बाजी मारत तालुक्यावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, सुनील पोळ तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, बाळासाहेब माने, प्रा. विश्वंभर बाबर त्याचबरोबर अनिल देसाई, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, बबन वीरकर आदींनी एकत्रित लढा दिल्याने ‘आमचं ठरलंय’ गटानेही चांगले यश मिळवल्याचे दिसून आले.

राज्यातील सत्तेत शिवसेना आहे. मुख्यमंत्रिपदही सेनेकडेच आहे. तरीही तालुक्यातील अनेक गावात शिवसेनेला साधे पॅनलही टाकता आले नव्हते. ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना नेते शेखर गोरे यांनी फारसे लक्ष दिले नाही. ज्या ग्रामपंचायतीत लक्ष दिले तेथे यश मिळविले. परंतु, तालुक्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी वर्षानुवर्षे जागा अडवून बसले आहेत. त्यांनी शिवसेना वाढविण्याचा फारसा प्रयत्न केला नसल्यानेच निवडणुकीत नगण्य यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चौकट :

चिठ्ठीवर धनाजी शिंदे विजयी...

ग्रामपंचायत निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे असते. त्यातच समान मते मिळाली तर चिठ्ठीचा पर्याय असतो. अशाचप्रकारे पानवण ग्रामपंचायतीत एका सदस्याची निवड चिठ्ठीद्वारे झाली. पानवण येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये जयसिंग नरळे आणि धनाजी शिंदे यांना समान ३१७ मते मिळाली. त्यानंतर धनाजी शिंदे हे चिठ्ठीवर विजयी झाले.

फोटो दि.१८ दहिवडी पॉलिटिकल फोटो नावाने...

फोटो ओळ : माण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर अनेकांनी जल्लोष साजरा केला. (छाया : नवनाथ जगदाळे)

...............................................................

Web Title: MLA's Sarshi; ‘We have decided’ is powerful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.