मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 06:27 PM2021-07-16T18:27:46+5:302021-07-16T18:30:39+5:30

CoronaVIrus In Satara Ramraje : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत, यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

MLAs should pay attention to constituency facilities: Ramraje | मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजे

मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजे

Next
ठळक मुद्देमतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजेकोरोना आढावा बैठकीत तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन

सातारा : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत, यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते.

या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी कोरोनाचे टेस्टिंग होते त्या ठिकाणी गर्दी होत आहे, ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभे केले जात आहेत. त्यांना लवकरात लवकर कार्यान्वित करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कुणीही आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आतापासूनच तयारी करा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पॉझिव्हिटीचा रेट कमी होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये कुठेलेही नियम पाळले जात नाहीत. प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले. बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

Web Title: MLAs should pay attention to constituency facilities: Ramraje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.