सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:56+5:302021-03-15T04:34:56+5:30

मनसेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सभासद नोंदणी अभियानास अ‍ॅड. विकास पवार यांच्याहस्ते रविवारी कऱ्हाड शहरात प्रारंभ झाला. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष ...

The MNS is committed to solving the problems of the common man | सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबद्ध

सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबद्ध

googlenewsNext

मनसेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सभासद नोंदणी अभियानास अ‍ॅड. विकास पवार यांच्याहस्ते रविवारी कऱ्हाड शहरात प्रारंभ झाला. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष महेश जगताप, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहर अध्यक्ष सागर बर्गे, सतीश यादव, नितीन महाडिक, संदीप लोंढे, राजेंद्र कांबळे, उत्तम बागल, संभाजी सकट, झुंझार यादव, अमोल हरदास, शिवराज यादव, बाळासाहेब सातपुते, रोहित मोरे, आबा गडाळे, प्रतीक पवार व मनसैनिक उपस्थित होते.

अ‍ॅड. विकास पवार म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याने मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीस युवकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पंधरा वर्षांतील मनसेचे काम व चळवळ जनतेसमोर आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरातही सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद आहे.

सागर बर्गे म्हणाले, महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या मनसेला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याबरोबरच आज राज्यात भक्कम विरोधी पक्ष म्हणून मनसे सक्षमपणे काम करीत आहे. राज्यात तीन पक्षांच्या सरकारचे त्रांगडे असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. अशावेळी मनसेकडून लोकांना अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनसे काम करत आहे.

फोटो : १४केआरडी०३

कॅप्शन :

कऱ्हाडात मनसेच्या सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास पवार, महेश जगताप, दादासाहेब शिंगण, सागर बर्गे आदी उपस्थित होते.

Web Title: The MNS is committed to solving the problems of the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.