माउलींची वारी मोबाईल अ‍ॅपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:13 PM2018-07-08T22:13:37+5:302018-07-08T22:14:17+5:30

Mobile app for mobile users | माउलींची वारी मोबाईल अ‍ॅपवर

माउलींची वारी मोबाईल अ‍ॅपवर

Next


लोणंद : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्याहून मार्गस्थ झाला असून, शुक्रवार, दि. १३ रोजी वैष्णवांचा मेळा लोणंद मुक्कामी येत आहे. माउलींचा सातारा जिल्ह्यातील लोणंद या ठिकाणी पहिलाच मुक्काम असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, वारीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने ‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल अ‍ॅप विकसीत केले असून, याद्वारे भाविकांना सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
लोणंद येथे झालेल्या आढावा बैठकीत सूचना केल्याप्रमाणे सर्वच विभागांच्या कामांना गती मिळाली आहे. लोणंद शहरातील कचरा, गटारांची सफाई, रस्त्याकडेची झुडपे, बाभळी काढणे, वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी लोणंद व परिसरातील मोकळ्या जागांची स्वच्छता करणे, पावसामुळे चिखल होणाºया भागात मुरुम टाकणे तसेच पालखी मार्गावरील रेल्वे पुलाची स्वच्छता करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याकरिता तीन फिलिंग पॉर्इंट तयार करण्यात आले आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील सर्व खांबांवरील दिव्यांची तपासणी करण्यात आली आहे. पालखी तळावर माउलींच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून, त्या ठिकाणी चौदा हायमास दिव्यांचे मनोरे उभारण्यात आले आहेत. दर्शन रांगेसाठी बॅरिगेट्स उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
आषाढी वारी २०१८...
यावर्षीच्या वारीच्या नियोजनासाठी व भाविकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ‘आषाढी वारी २०१८’ मोबाईल अ‍ॅप भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये वारकरी व भाविकांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक, वारीचा दिनक्रम, कोणत्या ठिकाणी भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती या अ‍ॅपमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे.
वारकºयांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी.
‘निर्मलग्राम’तर्फे ६५० स्वच्छतागृह उपलब्ध केले आहेत.
पालखी मार्गासह विजेची सोय करण्यात आली आहे.
रुग्ण वाहिका, अग्निशमन, आरोग्य पथके तैनात.
भाविकांच्या सुरक्षेसाठी वॉकी-टॉकी.

Web Title: Mobile app for mobile users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.