मोबाईल मालकाची ४० हजारांची फवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:01 PM2019-12-16T12:01:34+5:302019-12-16T12:02:36+5:30
तीन नवीन मोबाईल घेताना ४० हजारांचा धनादेश दिला. मात्र, तो न वटल्याने मोबाईल मालकाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विश्रूत नवाथे (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : तीन नवीन मोबाईल घेताना ४० हजारांचा धनादेश दिला. मात्र, तो न वटल्याने मोबाईल मालकाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विश्रूत नवाथे (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विशाल सुधाकर नलवडे (वय ३५, रा. वाढे फाटा, सातारा) यांचे मार्केट यार्ड परिसरात फ्रेड्स कम्युनिकेशन या नावाची मोबाईल शॉपी आहे. त्यांच्या दुकानामध्ये नवाथे हा गेल्या महिन्यामध्ये मोबाईल खरेदीसाठी आला होता. यावेळी त्याने तीन नवीन मोबाईल खरेदी केले. मात्र, धनादेशद्वारे पैसे देतो, असे त्याने सांगितले. नलवडे यांच्याकडे धनादेश दिल्यानंतर त्यांनी बँकेत टाकला. मात्र, हा धनादेश बाऊन्स झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नलवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी नवाथे याला पकडण्यासाठी पोलीस घरी गेले असता तो फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.