आंबे खरेदी करताना युवकाचा मोबाईल चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:11+5:302021-07-04T04:26:11+5:30

सातारा : रस्त्याकडेला असणाऱ्या गाड्यावरील आंबे खरेदी करत असताना एका युवकाचा मोबाईल चोरट्याने हातोहात चोरून नेला. त्यामुळे ...

Mobile theft of youth while buying mangoes | आंबे खरेदी करताना युवकाचा मोबाईल चोरीस

आंबे खरेदी करताना युवकाचा मोबाईल चोरीस

Next

सातारा : रस्त्याकडेला असणाऱ्या गाड्यावरील आंबे खरेदी करत असताना एका युवकाचा मोबाईल चोरट्याने हातोहात चोरून नेला. त्यामुळे या युवकाला आंबे खरेदी करणे चांगलेच महागात पडले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत गजानन जाधव (वय ३१, रा. आसरे, ता. कोरेगाव) हा युवक खासगी नोकरी करतो. शुक्रवारी सकाळी ११ वाजता विसावा नाका परिसरातील एका रस्त्याकडेला असलेल्या आंब्याच्या गाड्यावर तो आंबे खरेदीसाठी गेला. यावेळी तो आंब्याचे दर विचारत असतानाच त्याच्या खिशातील मोबाईल चोरट्याने लांबवला. काहीवेळानंतर आपला मोबाईल चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने गाड्यावर जाऊन आंबे विक्रेत्याला मोबाईलबाबत विचारले. मात्र, मोबाईल त्याने घेतला नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दाखल केली. दम्यान, चोरीला गेलेल्या मोबाईलची किंमत सुमारे आठ हजार रुपये आहे.

..........

Web Title: Mobile theft of youth while buying mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.