मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्र
By admin | Published: November 16, 2016 11:12 PM2016-11-16T23:12:40+5:302016-11-16T23:12:40+5:30
मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर
सातारा : सांगली-सातारा विधानपरिषदेचे कॉग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असून प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यावेळी मोहनराव कदम यांना जिल्ह्यातून मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
डॉ. पतगंराव कदम आणि मोहनराव कदम यांनी नेहमीच पक्षाची कवाडे बाजूला ठेवून शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना सहकाऱ्याची भुमिका घेतल्याने त्याचा फायदा मिळेल, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला
आहे. दरम्यान, सांगलीतील विशाल पाटील गटानेही कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे.
मोहनरावांसाठी सातारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदाराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, अॅड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भिमरावकाका पाटील, हिंंदुराव पाटील, प्रल्हाद साळुंखे-पाटील, धैर्यशिल कदम, डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते शंकराव गाढवे, अॅड. बाळासाहेब बागवान, गुरूदेव बरदाडे, अविनाश नलवडे, विजय भिलारे, सतीष भोसले, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम यांच्यासह नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. (प्रतिनिधी)