महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:29 AM2019-11-19T00:29:14+5:302019-11-19T00:29:31+5:30
सातारा : महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. आता बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे पोलिसांना ...
सातारा : महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. आता बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे पोलिसांना सोपे जाणार आहे. महामार्गावर ही वाहने ‘वॉच’ ठेवणार आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून सातारा जिल्ह्यातील महामार्ग पोलीस केंद्र भुर्इंज व महामार्ग पोलीस केंद्र कºहाड यांना अत्याधुनिक सुविधांनी सज्ज वाहने प्राप्त झाली. पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा येथे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या वाहनांची पाहणी करून यामधील विविध उपकरणांची माहिती करून घेतली. महामार्ग पोलिसांना नमूद वाहनांच्या वापराबाबत मार्गदर्शन करून अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी भुर्इंज महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक माने तसेच कºहाड महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक कलके व महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते.
वाहनांमध्ये मद्यधुंद वाहनचालकांची चाचणी घेण्यासाठी ‘ब्रेद अॅनालायझर’ मशीन उपलब्ध असणार असून, जे वाहनचालक मद्यसेवन करून वाहन चालवताना आढळून येतील, त्यांची जागेवरच या उपकरणाच्या साह्याने चाचणी करून दोषी आढळल्यास त्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८५ प्रमाणे कोर्टात खटला दाखल करण्यात येणार आहे.
या अत्याधुनिक वाहनांमध्ये लेझर स्पीडगन बसवण्यात आली असून, या लेझर स्पीडगनच्या साह्याने राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालवणाºया सर्व प्रकारच्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८३ प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या वेग मर्यादेबद्दल अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगावकर यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढलेली असून, या अधिसूचनेनुसार सोमवारपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
‘टिंटोमीटर’ हे मशीनही या वाहनांमध्ये उपलब्ध असून, त्याद्वारे वाहनांवर काळी फिल्म काच असणाºया वाहनांवर केंद्र्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ नियम १०० (२) प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाहतूक विभागास प्राप्त ई-चलन मशीनच्या साह्णाने महामार्गावर लेन कटिंग करणाºया, महामार्गाच्या उजव्या बाजूने अवजड वाहन चालवणाºया वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.