मोडक्या खुर्च्या, टेबलांना नवसंजीवनी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:56 AM2017-08-03T00:56:14+5:302017-08-03T00:56:17+5:30

Modest chairs, Navjivani to the table! | मोडक्या खुर्च्या, टेबलांना नवसंजीवनी !

मोडक्या खुर्च्या, टेबलांना नवसंजीवनी !

Next


सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेच्या वापरात नसलेल्या साहित्याला नवीन आयुष्य मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. लिलाव योग्य भंगार व इतर साहित्य विकून जे साहित्य दुरुस्त करून वापरात आणण्याजोगे असेल त्या पुन्हा नवीन झळाळी दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमध्ये खुर्च्या, कपाटे, टेबल असे लाकडी व लोखंडी साहित्य पडून आहे. काही साहित्य विभागाबाहेरच्या जिन्याखाली अथवा पोर्चमध्ये ठेवलेले असते. तसेच खावली येथील गोदाममध्येही जुने साहित्य साठवून ठेवलेले आहे. झिरो पेंडन्सीच्या कामाची पाहणी करत असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या ही बाब निदर्शनास आली. यातील बरेचसे साहित्य पुन्हा वापरात येऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांना वापराजोगे साहित्य वेगळे करण्याच्या सूचना केल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सत्यजित बढे यांनीही सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्या. यासाठी वेगळी समिती नेमण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून जुन्या साहित्याला पुन्हा ऊर्जितावस्था देऊन जिल्हा परिषदेचा आर्थिक खर्च वाचविण्याचे एक स्तुत्य पाऊल टाकले आहे. अनेक विभागांमध्ये खुर्च्यांची कमतरता आहे.
झिरो पेंडन्सीच्या कामामुळे इतस्त: पडलेले साहित्य आता नीटनेटके लावलेले पाहायला मिळते. या साहित्यांसाठी कुलूपबंद कपाटे या साहित्यामधूनच तयार होऊ शकणार आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये खुर्च्या, कपाटे तसेच टेबल असे जुने साहित्य मोडलेल्या स्थितीत पडून आहे. ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे यातील बरेच साहित्य थोड्या खर्चात दुरुस्त करून पुन्हा कामात येऊ शकते. हे साहित्य एकत्रित करण्यात आले आहे. त्यातील जे पुन्हा वापरात येऊ शकते, ते साहित्य वेगळे करून ते दुरुस्त करण्यात येईल. याद्वारे नवीन वस्तू खरेदीसाठी लागणाºया पैशांचीही बचत होईल.
- डॉ. राजेश देशमुख,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद सातारा

Web Title: Modest chairs, Navjivani to the table!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.