मोदी सरकार हाय हाय; इंधन दरवाढ रद्द करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:12+5:302021-05-31T04:28:12+5:30

सातारा : केंद्र शासनाला सात वर्षे झाली. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने देशाला भकास करण्याचेच काम केले आहे. जीएसटी आणि ...

Modi government hi hi; Cancel fuel price hike ... | मोदी सरकार हाय हाय; इंधन दरवाढ रद्द करा...

मोदी सरकार हाय हाय; इंधन दरवाढ रद्द करा...

Next

सातारा : केंद्र शासनाला सात वर्षे झाली. मात्र, केंद्रातील मोदी सरकारने देशाला भकास करण्याचेच काम केले आहे. जीएसटी आणि नोटबंदी फसली. शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे केले, असा आरोप करत काँग्रेसकडून साताऱ्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी काळे झेंडेही दाखविण्यात आले तसेच ‘मोदी सरकार हाय-हाय, इंधन दरवाढ रद्द करा’, अशा घोषणाही देण्यात आल्या.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर रविवारी दुपारी राष्ट्रीय काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोजकुमार तपासे, बाळासाहेब शिरसाट, अन्वर पाशा खान, अ‍ॅड. दत्तात्रय धनावडे, अमर करंजे, मालन परळकर, रवी भिलारे, अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, माधुरी जाधव, नंदाभाऊ जाधव, नजीम इनामदार, चंद्रकांत वाटकर, संतोष डांगे, राजू खवळे, आदी उपस्थित होते.

याबाबत प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे करण्याचे कामही केंद्र शासनाने केले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात येत आहे.

फोटो दि. ३० सातारा काँग्रेस फोटो... मेल...

फोटो ओळ : सातारा येथे रविवारी जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेसकडून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. सुरेश जाधव, धनश्री महाडिक, विराज शिंदे, आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)

Web Title: Modi government hi hi; Cancel fuel price hike ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.