नोटाबंदीच्या निर्णयानं मोदींनी देशाला खड्ड्यात घातलं: पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 09:09 PM2018-11-11T21:09:36+5:302018-11-11T21:10:20+5:30
कºहाड : देशातील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लादून सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा हल्ला केला आहे. त्यांनी केवळ ...
कºहाड : देशातील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय लादून सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही मोठा हल्ला केला आहे. त्यांनी केवळ हेकेखोर व हट्टीपणे हा निर्णय घेतला. त्यामुळे १२५ लोकांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर लाखो लोकांचा रोजगार गेला. काळा पैसाही नष्ट झाला नाही. उलट या निर्णयामुळे देशाला खड्ड्यात घालण्याचे कृत्य घडले आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाची संसदीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कºहाड येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली नोटाबंदीच्या विरोधात रविवारी काळ्या फिती लावून काळा दिवस साजरा करीत निर्दशने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.