मोदींविरोधात समविचारींना घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:01 AM2018-06-04T00:01:26+5:302018-06-04T00:01:26+5:30

Modi will take the agreements against Modi | मोदींविरोधात समविचारींना घेणार

मोदींविरोधात समविचारींना घेणार

Next


कºहाड : ‘मोदी सरकारने निवडणूक आयोग, न्यायालय, लोकशाही संस्था आदींचे महत्त्व संपुष्टात आणण्याचे काम सुरू केले आहे. याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार हटविणारच आहोत. मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची आघाडी ही समविचारी आणि धर्मनिरपेक्षता मानणाºया पक्षांची असेल. त्यांनासोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कºहाड येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण आदींची उपस्थिती होती.
चव्हाण पुढे म्हणाले, ‘भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. लोकांना स्वप्ने दाखवित आहेत. मात्र, आता लोकांच्याही सत्य परिस्थिती लक्षात येत आहे.
गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्षाने अंमलात आणलेल्या योजनांची नावे मोदी सरकारने बदलेली आहेत. आता लोकसभेत बहुमत असणाºया भाजपला पुढील काही महिन्यांत राज्यसभेतही बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी आतापेक्षा अधिक मनमानी कारभार सुरू करतील.
याची जाणीव झाल्यामुळेच विरोधी पक्ष त्यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीविरुद्ध एकत्र येऊ लागले आहेत.’
शिवसेना, तेलगू येथील जुने मित्रपक्षही मोदींच्या एकाधिकारशाहीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे येणाºया २०१९ मध्ये सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान मोदींच्यापुढे उभे राहिले आहे. गुजरात तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पातळी सोडून मोदींनी माजी पंतप्रधानांवर टीका केली. हे तेथील जनतेलाही आवडले नाही. नोटाबंदीच्या अनावश्यक निर्णयानंतर बेरोजगारी वाढली, हजारो उद्योगधंदे बुडाले, लाखो लोक बेरोजगार झाले. मोदी सरकार हे आतापर्यंतचे सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. परंतु कोणावरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला की त्याला क्लिनचिट दिली जाते.
‘जनशक्ती’कडून विश्वासघात..
‘जनशक्ती’चे नगरसेवक भाजपा नेत्यांच्या कार्यक्रमात दिसतात. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी चव्हाण यांना छेडले असता, ‘जनशक्ती’च्या नगरसेवकांनी आपला विश्वासघात केला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यांच्यातील कोणाची किती कुणाशी जवळीक वाढली आहे, याची माहिती मी घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीसांचे सरकार हे क्लिनचिटचे
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे क्लिनचिटचे सरकार आहे. भाजपच्या मंत्र्यांवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांना क्लिनचिट देण्यापलीकडे मुख्यमंत्र्यांनी दुसरे काही केले नाही. त्यामुळे फडणवीस सरकार हे क्लिनचिट देणारे सरकार आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
अजून दोन-तीन राज्यमंत्री दिले तरी फरक पडत नाही
कºहाड दक्षिणेत भाजपने दोघांना राज्यमंत्री पदे दिली आहेत. याबाबत तुमचं काय मत आहे? असा प्रश्न चव्हाण यांना विचारताच अजून दोन-तीन राज्यमंत्री पदे दिली तरी फरक पडत नाही. जर पक्ष निवडूनच येणार नसेल तर या पदांचा काय उपयोग, असा प्रश्नही त्यांनी यावेळी माध्यमांना केला.
मलकापूरची निवडणूक विकासकामावरच
होऊ घातलेली मलकापूरची निवडणूक आम्ही विकासकामाचे मुद्दे नागरिकांसमोर मांडून लढविणार आहोत. आजवर केलेली विकासकामे आणि भविष्यात करणारी विकासकामे लोकांना पटवून देऊ, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मनोमिलनाबाबत निवडणूक लागल्यावर बोलू की
मलकापूर निवडणुकीत बाबा-काका मनोमिलन होणार असल्याची चर्चा आहे, याबाबत खरं काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच मनोमिलनावर निवडणूक जाहीर झाल्यावर बोलू की, एवढच उत्तर हसत-हसत देणं चव्हाण यांनी पसंद केलं.

Web Title: Modi will take the agreements against Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.