मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पतंगरावांची साद! अतुलबाबांची ‘गुगली : पतंगरावांचे आवाहन अन् मदनदादांचा प्रतिसाद; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:03 AM2017-12-23T00:03:05+5:302017-12-23T00:05:59+5:30

कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली.

Mohite-Bhosale celebrate kite-flying! 'Gogali of Atulbaab': The appeal of Kites and appeals to Madanadas; Churches get up in the political circles | मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पतंगरावांची साद! अतुलबाबांची ‘गुगली : पतंगरावांचे आवाहन अन् मदनदादांचा प्रतिसाद; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पतंगरावांची साद! अतुलबाबांची ‘गुगली : पतंगरावांचे आवाहन अन् मदनदादांचा प्रतिसाद; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली‘त्याच्या जन्माच्या अगोदर कृष्णाकाठच्या यशवंत-जयवंत यांचं बंधुप्रेम

प्रमोद सुकरे ।
कºहाड : जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर राजकीय फटकेबाजीही अनुभवायला मिळाली. प्रास्ताविकातच अतुलबाबांनी पतंगरावांना उद्देशून ‘गुगली’ टाकली. त्यावर माजीमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते-भोसले मनोमिलनासाठी पुन्हा एकदा साद घातली. तर त्याला मदनदादांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

खरंतर आजच्या कार्यक्रम पत्रिकेवर निमंत्रित म्हणून डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते आणि डॉ. अतुल भोसले या तिघांचीच नावे होती. त्यामुळे डॉ. इंद्रजित मोहिते या कार्यक्रमासाठी असणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनात
शंका होती. मात्र, प्रत्यक्षात मोहिते-भोसले कुटुंबाचे मार्गदर्शक असणाºया माजीमंत्री पतंगराव कदम यांच्यासोबत डॉ. इंद्रजित मोहितेही व्यासपीठावर कार्यक्रमाला हजर राहिले.

त्यामुळे अनेकांच्या शंकांना उत्तर मिळाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यासपीठावरील मान्यवरांचा उल्लेख करताना भारती विद्यापीठाचे प्रमुख डॉ. पतंगराव कदम यांचा विशेष उल्लेख केला. ‘त्यांचे आमच्या कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे,’ असे सांगतानाच ‘फक्त इंद्रजितबाबांवर जरा जास्तच प्रेम आहे,’ असा चिमटा त्यांनी काढला. त्यावेळी उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
मात्र, आता पतंगराव कदम काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागली होती. डॉ. पतंगराव कदम बोलायला उभे राहिल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत ‘अतुल तरुण नेता आहे,’ अशी सुरुवात केली. ‘त्याच्या जन्माच्या अगोदर कृष्णाकाठच्या यशवंत-जयवंत यांचं बंधुप्रेम साºया महाराष्ट्राला माहिती होतं पण त्याला दृष्ट लागली. हे घरएकत्र राहिलं पाहिजे, अशी माझी इच्छा होती, आहे आणि राहील.
सगळे एकत्र आल्याशिवा गतवैभव प्राप्त होणार नाही,’ असे सांगायलाही यावेळी पतंगराव कदम विसरले नाहीत.
पतंगराव कदम यांंच्या भाषणानंतर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते बोलायला उभे राहिले. त्यांनी अप्पा आणि भाऊंच्या कार्याबद्दल बोलतानाच, ‘पतंगराव कदम यांनी सांगितलेले मला पटलं आहे. म्हणून तर मी अतुलच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतलाय,’
असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.

अर्ज काढून घेतले नसते तर..!
या साºयांचा मी एकदा मेळ घातला होता. त्यावेळेला सुरेशबाबांनी जर आपल्या समर्थकांचे कृष्णा कारखाना निवडणुकीतील अर्ज मागे काढून घेतले नसते तर कारखाना चुकीच्या लोकांच्या ताब्यात गेला नसता. आणि कारखान्याचा खेळखंडोबाही झाला नसता, अशा कानपिचक्याही पतंगरावांनी यावेळी दिल्या.

‘ते’ काळ ठरवेल
राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत असतात. त्यानुसार अतुललाही काही राजकीय निर्णय घ्यावे लागले आहेत. त्याने घेतलेले निर्णय बरोबर की चूक, हे येणारा काळ ठरवेल; पण घर एकत्र असणं गरजेचं असल्याचं पतंगरावांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

जयवंतराव अप्पाच भाजपमध्ये येणार होते!
माजीमंत्री चिमणराव डांगे यांनी आपल्या भाषणात जयवंतराव भोसले अप्पाच भाजपच्या चिन्हावर लोकसभेला उभे राहणार होते, असे सांगितले. मात्र, त्यावेळी कºहाड लोकसभेची जागा भाजप-शिवसेना युतीमध्ये सेनेकडे होती. त्यामुळे तांत्रिक अडचण असल्याने अप्पांनी शिवसेनाप्रणित उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असल्याचे डांगे यांनी सांगितले. हाच धागा पकडत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आजोबांची इच्छा नातवाने पूर्ण केली असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याला दाद दिली.

Web Title: Mohite-Bhosale celebrate kite-flying! 'Gogali of Atulbaab': The appeal of Kites and appeals to Madanadas; Churches get up in the political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.