खटावमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:43+5:302021-06-01T04:28:43+5:30
खटाव : खटावमध्ये रस्त्यावर मोकाट कुत्र्याची दहशत वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. या ...
खटाव : खटावमध्ये रस्त्यावर मोकाट कुत्र्याची दहशत वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
खटावमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे लहान मुलापासून ते वयोवृद्ध, तसेच वाहनचालकांना यांचा सामना करावा लागत आहे. मोकाट कुत्री घोळक्याने दिवसा व रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्त्यावर फिरत असतात, तसेच संपूर्ण मोकळा रस्ता हे त्यांच्या विश्रांतीचे ठिकाण असल्यामुळे त्यांना कोणी डिस्टर्ब केले तर मात्र वाहनधारक किंवा पादचाऱ्यांवर चवताळून ही कुत्री त्यांचा पाठलाग अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याच्या घटनादेखील वाढण्याची शक्यता अधिक आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना रस्त्यावर देखील कामानिमित्त घराबाहेर पडणे अवघड होत आहे. त्यामुळे माणसांवर कुत्र्याची भीती बसलेली दिसून येत आहे.
एकीकडे कोरोनाचे संकट उभे राहिले असताना दुसरीकडे रस्त्यावर मोकाटपणे फिरणाऱ्या कुत्र्यांपासून धोका अधिक आहे. कारण झुंडीने राहणाऱ्या कुत्र्यामध्ये एखादे कुत्रे पिसाळण्याची शक्यता अधिक असते. हा धोका लक्षात घेता नागरिकांनीच सावध राहणे गरजेचे आहे.
३१खटाव
कॅप्शन : खटावमध्ये रस्त्यावर मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. (छाया : नम्रता भोसले)