आनंदांच्या क्षणात अन् संकटकाळात ‘हम साथ-साथ है !’

By Admin | Published: December 31, 2015 10:47 PM2015-12-31T22:47:19+5:302016-01-01T00:06:37+5:30

शोेध सर्वात मोठ्या फॅमिलीचा : शहा घराण्याच्या सर्वोच्च यशाचे श्रेय केवळ संयुक्त कुटुंब पध्दतीलाच... बिग फॅमिली

In the moment of happiness and the crisis 'we are together!' | आनंदांच्या क्षणात अन् संकटकाळात ‘हम साथ-साथ है !’

आनंदांच्या क्षणात अन् संकटकाळात ‘हम साथ-साथ है !’

googlenewsNext

प्रगती जाधव-पाटील - सातारा --‘हेम’ ग्रुपच्या शतकीय वाटचालीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचे आमंत्रण सर्वांपर्यंत पोहोचले आणि कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी ‘रॉटव्हीलर’ने माझ्या उजव्या हाताचा चावा घेतला. जखम इतकी मोठी की किमान चार दिवस दवाखान्यातील मुक्काम पक्का! कार्यक्रम रद्द व्हायला नको म्हणून माझी धडपड सुरू होती, डॉक्टर वेदनाशामक इंजेक्शन देत होते; पण कार्यक्रमात येण्याचे बळ दिले ते कुटुंबाच्या शक्तीने!,’ कुटूंबाच्या एकीची वीण बिपीनभाई सांगत होते.
बिपीन कांतीभाई शहा आॅटोमोबाईल क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणारी तिसरी पिढी! साताऱ्यासह मायापुरी मुंबईत आपल्या कार्यकतृत्वाने यशाचा झेंडा रोवणाऱ्या शहा कुटुंबीयांचे यश हे त्यांच्या संयुक्त कुटुंबाचे असल्याचे जाणवते. घरात तीन पिढ्या एकत्र राहतात, बाजारपेठेतील चढ-उताराविषयी ते परस्परांशी चर्चा करतात; पण घरातील ज्येष्ठांचा प्रत्येक शब्द हा आदेशाप्रमाणे घेऊन बिपीन, हेमंत आणि विपुल शहा मार्गक्रमण करतात. त्यांची पुढची पिढीही पुढे जात आहे.एकत्र कुटुंबात राहिल्याने आम्ही व्यवसाय वृद्धीकडे लक्ष देऊ शकलो. ‘मायक्रो फॅमिली’ची अ‍ॅडजस्टमेंट आम्हाला कधी करावीच लागली नाही. कोणत्याही कार्यक्रमात जाताना मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात देणं हक्काचं वाटायचं. आजारी पडलं तर आईने केलेला काढा हजारो औषधांपेक्षा उपयुक्त असतो, असे बिपीनभाई सांगतात. ‘कुटुंब एकत्र आले की, ती ऊर्जा ताकद बनून राहते. जगात शहा कुटुंबीय कुठेही असले तरी लक्ष्मीपूजन साताऱ्यात कर्मचाऱ्यांसह आणि वर्षातून एकदा देवदर्शनासाठी गुजरात दौरा हे ठरलेलाच आहे,’ असे विपुलभाई सांगतात.


शहा कुटुंबात
तब्बल १८ सदस्य...
कालिदास भाईचंद शहा आणि हेमकुवर कालिदास शहा यांना दोन मुले कांतीभाई आणि विनोदभाई. कांतीभार्इंची पत्नी जसवंती यांना दोन मुले बिपीन आणि हेमंत. बिपीन-ममता यांना ईशान आणि मानसी ही दोन मुलं, तर देवांशी ही स्नुषा. हेमंत-निपा यांना आशंक आणि आलेखा ही दोन मुलं, तर सून ध्वनी. विनोदभार्इंची पत्नी साधना त्यांना एक मुलगा विपुल. विपुल-कविता यांना हेनल आणि आयुष ही दोन मुलं.

Web Title: In the moment of happiness and the crisis 'we are together!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.